गीतेच्या शेवटच्या अध्यायातील शेवटच्या श्लाेकावर ज्ञानेश्वर भाष्य करीत आहेत. हा श्लाेक असे सांगताे की, जिकडे याेगेश्वर कृष्ण व धनुर्धर पार्थ आहे तिकडे श्री, विजय, ऐश्वर्य, नीती, यांचे वास्तव्य असते. यावर ज्ञानेश्वर स्पष्टीकरण देताना विविध प्रकारचे दृष्टांत देऊन चकित करीत आहेत.ते म्हणतात की, जेथे आयुष्य आहे तेथे जगणे आहे. जेथे चंद्र तेथे चांदणे असायचेच. जेथ शिव तेथे शक्ती म्हणजे पार्वती असावयाची. संत तेथे सुविचार असावयाचा. अथवा राजा तेथे सैन्य, प्रेम तेथे संबंध आणि अग्नी तेथे ज्वलनाची शक्ती असावयाची.हीच दृष्टांतमालिका वाढवून ज्ञानेश्वर म्हणतात, दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखप्राप्ती आणि सुखाच्या पाेटी परमात्मा पुरुषाेत्तम भेटताे. वसंत तेथे झाडांना नवी पालवी येते. ुले ुलतात. तेथे भ्रमरांचे समुदाय असतात. गुरू तेथे ज्ञान, ज्ञान तेथे आत्मदर्शन आणि आत्मदर्शन तेथे समाधान असते. भाग्य तेथे सुखभाेग, सुखभाेगाच्या पाेटी प्रसन्नता असते.
अर्जुना, हे राहू दे. सूर्य तेथे प्रकाश असावयाचाच.त्याप्रमाणे तुझ्या प्राप्तीमुळे मी सनाथ झालाे आहे.जेथे कृष्ण राजा आहे तेथे लक्ष्मी असावयाचीच.अणिमादिक सिद्धी तुझ्या दासी हाेत नाहीत काय? तू ज्यांच्या बाजूने उभा राहशील त्या बाजूला विजय प्राप्त हाेईल. येथे विशेष म्हणजे असे की, विजय हे अर्जुनाचे नाव आहे. आणि श्रीकृष्णही विजयाची मूर्ती आहे.तुझ्यासारखा मायबाप असताना येथील झाडांनाही कल्पतरूशी पैज जिंकता येईल. या देशातील सर्व दगड चिंतामणी हाेतील.सर्व भूमी सुवर्णमय हाेऊन जाईल. या गावच्या नद्या अमृताने भरून वाहू लागतील. हे सांगून संजय धृतराष्ट्राला म्हणताे की, दाेन्ही सैन्यांचे काय हाेईल हे मला माहीत नाही. पण राजा तू नीट विचार कर.