चाणक्यनीती

    07-Dec-2022
Total Views |
 
 

Chanakya 
2.फुल :फुलांचा रंग, आकार, गंध पाहिला जाताे.फुलांचा रंग सुंदर असेल, ते टवटवीत असेल; पण त्याला सुगंधच नसेल तर लाेक त्याच्याकडे पाठ िफरवतात.फुलाची खरी शाेभा म्हणजे त्याचा सुगंध, वसंत ऋतूत बहरणारी पळसाचीफुले अत्यंत सुंदर दिसतात; त्यांचे रंग, रूप (रंगसंगती) ारच माेहक असते; पळसाच्या मेहंदीरंगाच्या मखमली काेषातून उमललेले ‘बसंती’ रंगाच्याफुलांचे गुच्छ अत्यंत देखणे असतात; परंतु याफुलांना सुगंध नसताे.गंधहीन असल्याने त्यांची शाेभा हाेते. हीफुले देवाला वाहण्यासाठी किंवा गजरे करण्यासाठी वापरली जात नाहीत. त्यामुळे त्यांना फुलांच्या बाजारात स्थान नसते.
 
बाेध:विद्येशिवाय, गुणांशिवाय रंगरूप, तारुण्य, उच्चकुल सारे व्यर्थ आहे; जसे की, सुगंधहीन पळसाचे ूल. कारण विद्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने गुणवान बनविते.