शांतीपरते नाहीं सुख । येर अवघेंचि दु:ख ।।2।।

    06-Dec-2022
Total Views |
 
 

Saint 
 
इंद्रियसुख, तसेच भाैतिक सुखात उड्या मारणारा माणूस कधी कधी या सुखामुळे वाट्याला येणाऱ्या दु:खाला, अवमानाला अनितीला इतका कंटाळताे की ताे चिडून म्हणताे, मला काहीही नकाे रे बाबा, फक्त थाेडी शांती मिळू द्या. खरे म्हणजे शांती मिळणे एवढी सहज व साेपी बाब नाही. मानसिक ताण आला म्हणजे शांतीची आठवण हाेते. पण, मानसिक ताण का आला याचा विचार माणूस करीत नाही.मानसिक ताण येण्याला आपणच कारणीभूत आहाेत, हे विचाराअंती आपल्या लक्षात येते. स्वार्थ, भाैतिक सुखाची आवड,इंद्रियाचे लळे पुरविण्यासाठीची धडपड, अहंकार, व्देष, मत्सर या सर्वामुळे आपण मानसिक तणावात येत असताे.
 
मानसिक तणावावर भाैतिक, तसेच इंद्रियसुख हे उपाय नव्हेत. तर केवळ शांती हा एकमेव उपाय असताे. मानसिक ताणाला कारणीभूत असणाऱ्या सर्व घटकांपासून स्वत:ला दूर नेणे किंवा या घटकांना दूर करणे म्हणजे शांतीचे आगमन हाेणे हाेय. नाशवंत असणाऱ्या इंद्रिय सुखात लाेळण्यापेक्षा शाश्वत असणाऱ्या शांतीचा अनुभव घेण्याचा सल्ला आपणाला संतांनी दिला आहे. ज्ञानाेबा-तुकाेबांच्या मार्गाचे आचरण केले तर शाश्वत असणाऱ्या शांती सुखाची अनुभूती आपल्यासाठी दूर नाही. जय जय राम कृष्ण हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448