पत्र एकाेणतीसावे
कृष्णाने मात्र काेकरांना पकडावे त्याप्रमाणे त्या बैलांना पकडले व बांधून टाकले आणि पण जिंकला. मी धन्य झाले.कृष्णासारखा पती मला मिळाला. त्याची सेवा मला सदासर्वदा घडाे.
(7) मित्रविंदा म्हणालीकृष्ण माझा मामेभाऊ. माझे मन प्रथमपासून कृष्णावर आस्नत झाले हाेते. माझे नशिब बलवत्तर म्हणून कृष्णाने मला पत्नीपद देऊन कृतार्थ केले. मला त्याच्या पादस्पर्शाचे भाग्य जन्माेजन्मी घडाे म्हणजे माझे कल्याण हाेईल.
(8) लक्ष्मणा म्हणालीहे द्राैपदी, तुझ्या स्वयंवराचे वेळी मत्स्ययंत्र तयार केले हाेते, त्याप्रमाणे माझ्या स्वयंवराच्या वेळीही मत्स्ययंत्र तयार केले हाेते.
मात्र भेद असा हाेता की तुझ्या वेळचा मत्स्य बाहेरून झाकला हाेता. त्याच्या खाली उभे राहणाऱ्यालाच फ्नत ताे दिसला हाेता. पण माझ्या वेळचा मत्स्य काेठूनही दिसत नसून त्याचे प्रतिबिंब मात्र पाण्यात दिसत हाेते. हा पण तुझ्या वेळच्या पणापेक्षा फार कठीण हाेता.बड्या बड्या धनुर्धरांनी ताे प्रयत्न करून पाहिला, पण काेणालाच ताे पण जिंकता आला नाही. मग कृष्ण पुढे आला त्याने प्रतिबिंबाकडे पाहून बाण साेडला व बराेबर मत्स्याचा वेध घेऊन त्याला खाली पाडले व पण जिंकला. धनुर्धरांचा अग्रणी, मेरुमणी, शिराेमणी असा कृष्ण माझा पती झाला, असे पाहून माझा आनंद गगनात मावेना, पूर्वजन्मी मी केलेली तपश्चर्या फळाला आली, द्राैपदी मला जाे कृष्णाचा सहवास मिळताे ना त्यामुळे माझ्या भाग्याला पारावार नाही.
कृष्णाला एक नव्हे, तर आठ बायका हाेत्या. सर्वसाधारण बायकांचा स्वभाव पाहिला तर कृष्णाच्या जीवनात महान असंताेष नांदायला पाहिजे हाेता. पण सर्वच बाबतीत श्रेष्ठ असणाऱ्या कृष्णाचे आपल्या बायकांच्या बराेबर वर्तन असे हाेते, की त्यामुळे प्रत्येक पत्नी त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असे व कृष्णाचे प्रेम पाहून स्वत:ला धन्य धन्य समजत असे.मनुष्य कितीही पराक्रमी असला, विद्वान असला तरी आठ बायकांना प्रेमरज्जूने बांधून ठेवणे महाकर्मकठीण आहे.ज्ञानाच्या जाेरावर हे साधारण नाही, कर्माच्या जाेरावर हे जुळणार नाही, तर भ्नितप्रेमाचा उच्चांक असेल व त्याला ज्ञान व कर्म यांची जाेड असेल तरच अत्यंत अवघड असणारी गाेष्ट साधू शकेल.
कृष्णाच्या जीवनाचे सार, गुह्य, रहस्य भगवद्गीतेत आले आहे. ते सार गुह्य रहस्य असे आहे की.मानवी जीवनाचे कल्याण हाेण्याकरिता ज्ञान, कर्म व भ्नती यांचा समन्वय झाला पाहिजे व ताे समन्वय करताना जास्तीत जास्त जाेर भ्नतीवर दिला पाहिजे. भ्नती नसेल तर नुसत्या ज्ञानाच्या अथवा कर्माच्या जाेरावर सुखशांति प्राप्त हाेणार नाही. विना भ्नती नाही सुखशांति.असे आहे म्हणूनच गीतेचा ‘उपसंहार’ करताना व गुह्यातले गुह्य सांगताना कृष्णाने भ्नतीवर बाेट ठेवले आहे.कृष्ण आदर्श पुत्र आहे, आदर्श मित्र आहे, आदर्श बंधू आहे, पण त्याहीपेक्षा विशेष म्हणजे ताे-- आदर्श वल्लभ आहे.कृष्णाने आठ लग्ने केली याबद्दल काेणीही आक्षेप घेत नाहीत. शिवाजी महाराजांनी देखील बरीच लग्नं केली हाेतीलाेकांचा आक्षेप असा आहे की--