एका हिंदी चित्रपटात तरुण मुलाच्या अकाली निधनाने खचलेला पिता यथार्थपणे म्हणताे की ‘‘बापके कंधेपे बेटेका जनाजा इससे भारी बाेझ दुनियामें हाे ही नहीं सकता’’ ही सर्व दु:खेही आधिभाैतिकच आहेत. शिवाय काेणत्याही संकटाने दु:ख हाेणे, दारिद्र्य येणे, कर्जबाजारी हाेण्याची पाळी येणे, स्वदेश साेडून परदेशी पळून जाण्याची वेळ येणे, सर्वस्व चाेरांनी लुटणे, एखादी जड वस्तू अंगावर पडून जखमी हाेणे आणि गरिबीमुळे गांजून घाणेरडे अन्नसुद्धा खावे लागणे, अशी या त्रासाची वेदनादायक उदाहरणे पाहावयास मिळतात.दुष्काळ, साथीचे भयानक राेग, विनाकारण कलह, संशयाने भाेगावे लागणारे त्रास, काळजी असेही हे आधिभाैतिक त्रास असू शकतात.
त्यांची गणना व यादी करावयाची झाली, तर ती कधीही न संपणारी हाेईल इत्नया विविध प्रकारे माणूस दु:खी कष्टी हाेऊ शकताे. हे हाेणारे दु:ख डाेंगराएवढे माेठे व न संपणारे असते, हे सांगण्यासाठी श्रीसमर्थ ‘‘आहेत दु:खाचे डाेंगर’’ अशी समर्पक शब्दयाेजना करतात आणि म्हणतात की, हे सर्व सांगण्यासाठी हेतू हाच आहे की, श्राेत्यांनी याचा जाणीवपूर्वक विचार करावा. त्यांनी हे जाणले म्हणजे आपले सुखाचे वाटणारे देहात्मक आयुष्य केव्हाही व कसेही दु:खदायक हाेऊ शकते हे त्यांच्या लक्षात येईल आणि ते लक्षात आल्यावर विषयवासना साेडण्याकडे आणि भ्नितमार्ग अनुसरण्याकडे त्यांचा कल हाेईल, अशी श्रीसमर्थांना खात्री वाटते! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299