राम मुळातच दयाळू आहे; त्याने काहीही केले तरी ती दयाच आहे.त्याचा आवाजच मधुर त्याचे रागावून बाेलणेही मधुर! म्हणतात ना, गवयाचे पाेर रडले तरी सुरावरच रडते, मांजर पडले तरी चार पायावर उभे रहाते, तसे रामाचे आहे : आतबाहेर दयाच दया.दयामूर्तीच ताे, त्याचा क्राेधही दयारूपच! रामाने शत्रूला मारले, पण मरणात उद्धार केला. रामाचा काेपही कल्याणकारक; म्हणूनच रामचरित्र गाेड. रामाचा ध्यास लागला पाहिजे. दशरथाला रामाचा विरह झाला, ‘राम, राम’ म्हणता-म्हणता प्राण गेला, त्याला सद्गती मिळाली. जटायूला माेठा आनंद झाला की मरतेवेळी रामाचे दर्शन झाले, आणि त्याला पहात-पहात, ‘राम, राम’ म्हणत-म्हणत प्राणाेत्क्रमण झाले. मारीचाला रावण म्हणाला, ‘सुवर्णमृग हाे आणि कपटाने रामलक्ष्मणांना सीतेपासून दूर ने, मग मी सीतेचे हरण करीन.’ मारीच प्रथम कबूल हाेईना.
रावण म्हणाला, ‘तू जर माझे ऐकले नाहीस तर मी तुला ठार मारीन.’ मारीच मनात म्हणाला, ‘रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्याच हातून मेलेले काय वाईट?’ मग रामरूप पहात-पहात त्याने प्राण साेडला; त्यालाही रामाने आत्मस्वरूपात मिळविले. रावणाला मंदाेदरी म्हणत हाेती, ‘महाराज, तुम्ही महान अपराध केलात.रामाची सीता त्याला देऊन टाका.’ मंदाेदरीने ार उपदेश केला, त्यामुळे त्याचे मन चलित झाले; त्याच्या मनात सात्त्विक भाव उगवला, सीता देऊन टाकावी असे त्याला वाटले. इतक्यात नारद आले, ते म्हणाले, ‘अरे, सीतेला साेडू नकाे; तिला साेडलेस तर रामाच्या हातून मरण्याचे भाग्य तुला मिळणार नाही!’ म्हणून रावणाने रामाच्या हातून मृत्यू पत्करला, आणि त्याच्या देखत प्राण साेडला.
मरणाचे महत्त्व ार आहे. आपण संतांच्या पुण्यतिथी करताे याचे कारण हेच की त्यांनी अंतकाळ साधला. रामाची सर्वच कृती गाेड, आकृती गाेड. मग त्याच्या नामात किती गाेडी असली पाहिजे! पण आपल्या अंतरात थाेडा तरी सद्भाव, विश्वास पाहिजे. अंतरी थाेडेतरी नामप्रेम असावे, मग नामस्मरणात ार आनंद येईल. आपल्यामध्ये प्रेम नाही असे आपल्याला वाटते; पण प्रेम नाही कसे? आहे, पण ते आपण प्रपंचात लावले आहे; तेच रामनामात लावायचे आहे. यासाठीच रामचरित्र ऐकावे.आपल्याला जुळणारे असेच रामचरित्र आहे. प्रापंचिकाला ते आदर्शरूप आहे. म्हणून त्याचेच अखंड स्मरण करावे.आपण रामाला अनन्य शरण जाऊ या, मग ताे सर्व अडचणी दूर करील. राम आपल्याला बाेलावताे आहे, पण आपणच ‘काम पुष्कळ असल्यामुळे’ जाऊ इच्छीत नाही, खरे ना? आणखी काय सांगावे बरे? आशीर्वाद.