ताे जीवनात राेज नव्या बंधनात पडताे, नव्या तुरुंगात पडताे. कुठे कुठे थांबून सावरून जर या सूत्राचा नीट विचार व उपयाेग केला. तर मी काय म्हणताे ते ध्यानात येईल. काही गाेष्टी अशा असतात, की त्या नुसत्या समजून घेऊन चालत नसतं, त्यांचा प्रयाेग करून पहावा लागताे. कृष्ण अर्जुनाला जे सांगत आहे त्या एकूण एक वैज्ञानिक प्रक्रिया आहेत, लॅबाेरेटरी मेथड्स आहेत.एखादाही व्यर्थ शब्द उच्चारीत अशा पैकी कृष्ण नाहीये. शब्दांचं अवडंबर माजवणाऱ्यांपैकी ताे नाही. सांगण्यासारखं तर काहीही जवळ नाही आणि सांगत मात्र सुटले आहेत, अशांपैकी कृष्ण मुळीच नाही. जे अगदी आवश्यक आहे तेवढेच, जे सांगितल्याशिवाय चालणार नाही तेवढेच कृष्ण सांगताे. त्याची सर्वच व्नतव्ये प्रयाेगात्मक आहेत. एक-एक सूत्र एक-एक जीवनासाठी प्रयाेग हाेऊ शकते आणि एका सूत्राचाही प्रयाेग केलात तरी, सगळी गीता न वाचताच ती आपल्यासमाेर उघडत जाईल. अन् सगळी गीता वाचली अन् प्रयाेग मात्र केले नाहीत, तर गीता एक बंद पुस्तक हाेईल.
ती कधीच उघडायची नाही. ती उघडायची किल्ली म्हणजेच -प्रयाेग, काेठूनही प्रयाेग सुरू करणे.हे सूत्र समजून घ्या, तपासून घ्या. आपण आपले मित्र आहात की शत्रू आहात ते पारखा.हे छाेटसं सूत्र आपण राेज तपासलंत तर थाेड्याच दिवसात एक गाेष्ट लक्षात येईल की, आपणच आपल्याशी केलेलं शत्रुत्व, इंच इंच आता आपल्याला दिसू लागलं. आपण पावलाेपावली आपले शत्रू आहात आणि आतापर्यंतचं आपलं सगळं आयुष्य स्वत:शी केलेल्या या शत्रुत्वानं घालवलं आहे. आणि आपण ओरडून म्हणता आहात की मी अभागी आहे, मी दु:खानं हाेरपळलाे आहे. आपणच आपल्याच पाठीवर चाबकाचे फटके मारून घेत आहात, स्वत:ला र्नतबंबाळ करून घेत आहात आणि दुसऱ्या हाताने र्नत पुसत आपणच रडत आहात-काय आपलं नशीब. आपल्याच हातांनी दु:ख निर्माण करीत आहात आणि मग ओरडत आहात, ‘काय भाग्य, काय नियती’. नाही, आपल्या नियतीचे आपणच नियंते असता.