चाणक्यनीती

    31-Dec-2022
Total Views |
 
 
 

Chanakya 
वाच्यार्थ : दु:ख आणि नैराश्य देणारे अनेक पुत्र असून काय ायदा? कुटुंबाचा आधार बनणारा एकच पुत्र असला, तरी सर्व कुटुंब त्याच्या आश्रयाने शांत जीवन जगू शकते.
 
भावार्थ : येथे चाणक्यांनी तापदायक ठरणाऱ्या अनेक पुत्रांचे आणि कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या एका पुत्राची तुलना केली आहे.
1. (संख्येने) अनेक पुत्र : कुटुंबात अनेक पुत्र आहेत; पण ते सदाचारी, आज्ञाकारी नाहीत; भांडखाेर, दिवाळखाेर आहेत. आई- वडिलांना वृद्धाश्रमात पाठविणारे आहेत; भाऊ- बहिणींविषयीचे कर्तव्यपालन करणारे नाहीत अशावेळी अशा पुत्रांमुळे संपूर्ण कुटुंब दु:खी, कष्टीच हाेते.