पत्र तेहतिसावे
समर्थांना भडभडून आले. ते म्हणाले - ‘हाेय, आई, हाेय, तुझा नारायण आला आहे.’ असे म्हणून समर्थ घरात गेले व त्यांनी आईच्या चरणांवर मस्तक ठेवले.समर्थांची आई समर्थांना प्रेमाने चाचपू लागली. डाे्नयावरून ताेंडावरून हातापायावरून ती माऊली हात फिरवू लागली व म्हणाली- ‘नारायणा वीस वर्षांनी तू मला भेटलास. राेज तुझी मी आठवण काढत हाेते. आज तू आलास, पण तुला पाहायला मला डाेळे नाहीत रे!’’ समर्थांनी रामाचे नाव घेऊन आईच्या डाेळ्यावरून हात फिरवला आणित्या माऊलीला एकदम दिसू लागले. ती म्हणाली‘नारायणा, ही भूतचेष्टा तू काेठून शिकलास!’ समर्थ म्हणाले- ‘आई, हे भूत म्हणजे रामायण. ही त्या रामरायाची कृपा आहे.’ सर्वा भूतांचे हृदय। नाम त्याचे रामराय। रामदास नित्य गाय। तेचि भूत गे माय।।
*** काही दिवस जांबेला राहून समर्थ पुन्हा तीर्थाटनाला निघाले.आणखी चार वर्षे तीर्थाटन करून ते कृष्णातीरी आले व तेथे त्यांनी धर्मस्थापनेचे कार्य सुरू केले.देव मस्तकी धरावा। अथवा हलकल्लाेळ करावा। मुलूख बडवावा बुडवावा। धर्मस्थापनेसाठी।। हे सूत्र ध्यानी धरून समर्थ कृष्णातीरी आले. शहाजी महाराजांच्या पुत्राने- शिवाजीने- स्वराज्य स्थापण्याच्या दिशेने काही पावले उचललेली हाेती. समर्थांना ताे शुभ शकुन वाटत हाेता. शहाजी राजांनी मसुरची जहागीर आणि कऱ्हाडची देशमुखी बळकावून आदिलशाही टापूत मराठेशाहीची एक छाेटीशी पाचर ठाेकली हाेती.समर्थ आले ते मसूर येथे व तेथून त्यांनी आपल्या कार्यास सुरवात केली. त्यांनी अकरा मारुती व हजाराे मठ स्थापन केले.आपल्या शिष्यांना त्यांचा उपदेश हाेता.सामर्थ्य आहे चळवळीचे। जाे जाे करील तयाचे। परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे।। शके 1566 मध्ये समर्थ कृष्णातटाकी आले व शके 1603 मध्ये ते निजधामास गेले.
समर्थांनी बारा वर्षांच्या काळांत नामस्मरण केले. त्यांनी जाे जप केला ताे तेरा अक्षरी मंत्राचा का गायत्रीमंत्राचा याबद्दल वाद आहे. समर्थ म्हणतात कीतेरा काेटी जप झाला म्हणजे देव भेटताे.यावर शंका काढण्यात येते की मंत्र असाे किंवा तेरा अक्षरी मंत्र असाे बारा वर्षांच्या काळांत तेरा काेटी जप कसा हाेईल? समर्थ प्रात:काळी उठून स्नानसंध्या करून संगमात उभे राहून सूर्य डाे्नयावर येईपर्यंत तप करत असत व मग इतर वेळी लेखन, वाचन वगैरे करत असत. हिशेब केला तर बारा वर्षांच्या पुरश्चरणाच्या काळांत तेरा काेटी जप हाेत नाही.माझा विचार तुला सांगताे. नामापुढे स्मरण असा शब्द आहे.देवाचे नुसते नाम घेणेचे नाही तर नामाबराेबर देवाचे स्मरण झाले पाहिजे.