गीतेच्या गाभाऱ्यात

    03-Dec-2022
Total Views |
 
 
पत्र एकाेणतीसावे
 

bhagvatgita 
 
लाेकांनी विचारले- ‘अरे तू तर सर्वांपेक्षा माेठा, तू काेण हाेणार?’ कृष्ण म्हणाला- ‘माझी पदवी फार माेठी आहे. मी सर्व सर्वांचा दास.’ तू असे लक्षात घे कीसारे भ्नत हे कृष्णाचे दास, पण कृष्णच झाला आपल्या दासांचा दास. ताे झाला दास म्हणूनच लाेकांनी त्याच्यावर ओतली भ्नती प्रेमाची रास. हा आहे रम्य सुरम्य वास.कृष्णाला परमात्मा समजून त्याच्या मूर्तीला गंधफुले वाहून आपले जीवन सुगंधित हाेत नाही. तर त्याच्या जीवनातील दिव्य माणुसकी समजून घेऊन त्या दिव्य माणुसकीचे अत्तर आपल्या अंगाला लावले तर आपले जीवन सुगंधित हाेते.कृष्णाच्या जीवनात रु्निमणी स्वयंवराचा प्रसंग फारच बहारीचा आहे. विदर्भाचा राजा भीष्मक कुंडिनपुरास आपल्या रूपवती कन्येचे रु्निमणीचे स्वयंवर करणार आहे, अशी बातमी कृष्णास कळली.
 
जरासंधाच्या दाेन मुली अस्ति व प्राप्ति या कंसास दिल्या हाेत्या. कृष्णाने कंसाला मारल्यामुळे जरासंध कृष्णाचा कट्टर शत्रू बनला हाेता. कृष्ण आला आहे असे पाहून भीष्मकाचा आप्त राजा क्रथकैशिक याने कृष्णाचे फार माेठे स्वागत केले.शाल्व व शिशुपाल संतापाने लाल झाले. ते म्हणाले- ‘कृष्ण काही राजा नाही. आमच्या देखत रु्निमणीने त्यास वरले तर ते आम्ही सहन करणार नाही. कृष्ण खूप पराक्रमी आहे. पण ताे राजा नाही. त्याला या स्वयंवरात येण्याचा अधिकार नाही.’ हा बाका प्रसंग पाहून दुसरे दिवशी सकाळी राजा क्रथकैशिकाने कृष्णाला आपले राज्य अर्पण करून त्याला मूर्धाभिषेक केला.हा प्रकार पाहून जरासंध, शाल्व, शिशुपाल वगैरे लाेक स्वयंवरावर बहिष्कार टाकून कुंडिनपुर साेडून आपल्या देशात चालते झाले .रु्निमणीचे स्वयंवर माेडले. कृष्णाने राजा क्रथकैशिकाला त्याचे राज्य परत केले व यादवसैन्य घेऊन ताे परत गेला.कृष्ण यावेळी पंचवीस वर्षांचा झाला हाेता. पूर्वी कुंडिनपुरास कृष्ण व रु्निमणी यांनी परस्परांना पाहिल्यापासून दाेघांनाही परस्परांबद्दल प्रेम वाटू लागले हाेते.
 
Love at First Sight म्हणतात ना तसा प्रकार झाला हाेता.इकडे जरासंधाच्या सल्ल्यावरून रु्निमणीला शिशुपालास देण्याचे ठरले. शिशुपाल कृष्णाचा आतेभाऊ हाेता, पण ताे कृष्णाचा हाडवैरी हाेता. रु्निमणी अठरा वर्षाची हाेती. शिशुपाल व रु्निमणी यांच्या विवाहाची कुंकुमपत्रिका द्वारकेस आली.कृष्णाचे रु्निमणीवर प्रेम हाेते. तिकडे रु्निमणी सुद्धा कृष्णप्रेमाने वेडी झाली हाेती.रु्निमणीने आईबापांना सांगितले.माझे लग्न तुम्ही शिशुपालाबराेबर लावाल तर मी आत्महत्या करीन व माझ्या प्रेताबराेबर शिशुपालाने लग्न लागेल.आईबाप घाबरले पण रु्नमी म्हणाला.‘जीव द्यायला काही जीव वाटेवर पडला नाही. स्त्रिया स्वतंत्र नसतात. रु्निमणीचे लग्न तुम्ही शिशुपालाबराेबरच झाले पाहिजे.’ रु्निमणीच्या प्रासादाभाेवती पहारा बसला व रु्नमीच्या परवानगीशिवाय तिला बाहेर पडता येईना.इकडे कृष्णाची मन:स्थिती देखील चमत्कारिक झाली.ताे आपल्या प्रासादात खिन्न मनाने चिंताक्रांत हाेऊन बसला.इत्नयात एक दूत आत येऊन म्हणाला