ओशाे - गीता-दर्शन

    03-Dec-2022
Total Views |
 
 

Osho 
जाे काेणी अशुभ स्थगित करील व शुभ लगेच करून टाकील ताे आपला स्वत:चा मित्र असताे आणि जाे शुभ स्थगित करील अन् अशुभ करून टाकील ताे आपला स्वत:चा शत्रू असताे. एक क्षणभर थांबून विचार करा-जे करण्याने दु:ख येणार आहे ते आपण करीत आहात काय? जर उत्तर हाे असेल तर आपण आपले शत्रू आहात. जाे स्वत:चा शत्रू असताे त्याचे अध:पतन चालू असतं. ताे खाली जाताे, आणखी खाली जाताे.अंधार, महा-अंध:कार, ्नलेश, आणखी ्नलेश असा त्याचा प्रवास हाेताे. ताे आपल्याच पायांनी नरकाचा मार्ग चाेखाळताे. पण जाे काेणी आपला स्वत:चा मित्र बनताे. ताे ऊर्ध्वयात्रेवर निघताे.वर चढत जाताे. त्याची यात्रा दिव्याच्या ज्याेतिसारखी आकाशाभिमुख हाेते. ताे पाण्यासारखा खड्ड्याकडे प्रवास करीत नाही, तर अग्निसारखा आकाशाकडे जाऊ लागताे.
 
ती जी वर जाणारी ऊर्ध्वगामी चेतना आहे, ताेच याेग. आपला मित्र बनणे हाच याेग आहे.आपला शत्रू हाेणे हाच अयाेग आहे. वरच्या दिशेने चढत जाणे हाच आनंद आहे.कृष्ण अर्जुनाला सांगताेय, अर्जुना याेग मंडल आहे अन् त्याचं सार हे आहे की, आत्मा स्वतंत्र आहे-आपलं अहित करायलाही आणि आपलं हित करायलाही. अहित करणं साेपं असतं कारण, पाणी खड्ड्याकडे जायचं असतं. हित करणं अवघड असतं कारण पर्वत- शिखराची उंची गाठायची असते. पण जाे काेणी आपला मित्र हाेईल ताे जीवनात मु्नतीचा अनुभव घेऊ शकताे. अन् जाे काेणी आपला