चाणक्यनीती

    03-Dec-2022
Total Views |
 
 
 

Chanakya 
वाच्यार्थ: मूर्ख व्यक्तीला नेहमी टाळावे, कारण ताे दाेन पायांवर चालणाऱ्या पशूप्रमाणे असताे. (कपड्यांमध्ये लपलेल्या परंतु) न दिसणाऱ्या काट्याप्रमाणे त्याचे बाेलणे सतत सलत राहते.
 
भावार्थ : चाणक्यांनी येथे मूर्ख व्यक्तीची तुलना चतुष्पाद प्राण्याशी केली आहे.
1. मूर्ख - मनुष्य हा चतुष्पाद प्राणी नसून द्विपाद प्राणी आहे, पशूंपेक्षा ताे ‘वेगळा’ आहे. म्हणूनच त्याचे पाय-पाेट-हृदय-मन- बुद्धी हे (ताे दाेन पायांवर असताना) वेगवेगळ्या पातळीवर असतात. त्याची बुद्धी सर्वांत श्रेष्ठ असते; परंतु मूर्खाला सदसद्विवेकबुद्धीच नसते, म्हणून त्याला येथे द्विपाद पशू (दाेन पायांवर चालणारा; पण माणूस नव्हे तर पशू!) म्हटले आहे. त्याचे बाेलणे हे न दिसणाऱ्या पण सलणाऱ्या काट्याप्रमाणे त्रासदायक असते.