मात्र त्या दाेघांचाही मूळ उपदेश एकच आहे की, आता गाेड वाटणारे विषयसुख अंती कडूच आहे आणि म्हणूनच खरे चिरंतन मधुर सुख एका भगवंताच्या पायाशीच आहे व त्यासाठी त्याची आवडीने भ्नती करणे, हाच एकमेव मार्ग आहे.इंद्रिये आणि विषय यापासून जे सुख मिळते असे वाटते त्याचा आरंभ जरी सुखमय असला तरी त्याच्यातच अंतिम परमदु:खाची बीजे असतात. आरंभ सुखांत व अंत दु:खात असाच हा ऐहिकाचा नियम आहे. हा नियमसुद्धा जगाच्या आरंभी सुरू झाला असून, जगाच्या अंतापर्यंत कायम राहणारा चिरंतन सत्यत्वाचा आहे.
म्हणून ज्याला शाश्वत चिरंतन सुख हवे असेल त्याने दु:खाचे जे मूळ आहे ते इंद्रियसुख, मी व माझे म्हणणारे आप्तस्वकीय आणि ऐहिक लाेभ यांचा त्याग करावा आणि अर्थातच रघुनाथाचे भजनी लागून एकतानतेने सश्रद्धतेने आणि पूर्ण शरणागत हाेऊन त्याची भ्नती करावी.वैराग्याचे असे निरूपण केल्यानंतर श्रीसमर्थ म्हणतात की, यावर श्राेत्यांच्या मनात हा भगवंत काेठे असताे? त्याची भ्नती कशी करावी? व मला ताे कसा प्राप्त हाेईल असे प्रश्न स्वाभाविकपणेच तीव्रतेने उठतात.त्यासाठी पुढील चाैथ्या दशकापासून ते भ्नितमार्गाचे विवरण करण्यास सुरुवात करीत आहेत आणि साधकांना उद्धरून जाण्याचा मार्ग दाखवित आहेत! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299