ओशाे - गीता-दर्शन

    28-Dec-2022
Total Views |
 
 

Osho 
 
मालक घरात येताे, सगळ्यांना बातमी कळते.ते सारे नाेकर खूश आहेत.त्यांच्यापैकी काेणीही थाेडेसुद्धा नाराज नाहीत.मालक परतल्याने, आपणच मालक असल्याची घाेषणा आता कुणीच करीत नाहीत. मालकाची हजेरीच घाेषणा बनून गेली आहे.बराेबर अशीच घटना इंद्रियांच्या जगात घडते. आपण वेगळे आहाेत असं आपण एकदा जाणलं आणि एकदा उभे राहून म्हणालात की, मी वेगळा आहे, की एक अजब अनुभव आपल्याला येईल - जी इंद्रिये कालपर्यंत आपल्याला ओढत हाेती, त्यांना हवं तिकडे तुम्हाला नेत हाेती, तीच इंद्रिये आता सावलीसारखी आपल्याजवळ उभी आहेत. आपल्या आज्ञेने वागायला त्यांनी आता सुरुवात केली आहे. आपण आज्ञाच दिली नाहीतर त्यात त्या इंद्रियांचा काय दाेष? आपण हजरच नसाल तर आज्ञा काेण देणार त्यांना? अन् लाेक इंद्रियांना दाेष देतच राहतात.
 
इंद्रिये माणसाची माेठी शत्रू आहेत.आपण जर मालक नसाल तर इंद्रिये शत्रू आहेत. हा भेद लक्षात ठेवला पाहिजे. आपण मालक असाल तर इंद्रिये मित्र हाेऊन जातात.म्हणून चुकूनद्धा इंद्रियांना शिव्या देऊ नका.कित्येकजण बसल्या बसल्या शिव्या देत राहतात. की इंद्रिये माेठी शत्रू आहेत, अन् इंद्रिये खड्ड्यात नेतात माणसाला इंद्रिये माणसालाअजिबात खड्ड्यात नेत नसतात, आपणच जर खड्ड्यात जात असाल तर इंद्रिये बिचारी साथ देतात. आपण स्वर्गाकडे जाऊ लागलात तर इंद्रियेदेखील आपणाला साथ देतात. ती फ्नत साधन म्हणून आहेत, पण कधी आपण मालकीची घाेषणाच केली नाहीत-आपणच आपल्या नाेकरांची लाळ घाेटत राहिलात. तर चूक काेणाची?