आपले व व्यक्त जगाचे नाते कसे अतूट आहे हे याही ओवीत ज्ञानेश्वर समजावून सांगत आहेत.माझ्याहून भूतसृष्टी निराळी नाही.आणि मी भूतसृष्टीहून निराळा नाही असे नीट ध्यानात ठेवावे. हे जग अव्यक्तपणात थिजल्यासारखेच असते. माझ्या इच्छेने ते विश्वरूपात प्रकट हाेते.अमूर्त असा मीच नावारूपाला येताे. पाण्यावर जसा ेस दिसताे, त्याप्रमाणे सर्व भूते माझ्या ठिकाणी बिंबित झालेली दिसतात; पण अर्जुना, ेसात पाणी दिसत नाही, त्याप्रमाणे सर्व भूतसृष्टी माझ्या ठिकाणी असली तरी मी त्या भूतसृष्टीत नसताे हे तुला मागे सांगितले आहेच. सर्व मीच आहे म्हणजे सर्व भूते माझ्या ठिकाणी आहेत असे मात्र नाही.
ज्याप्रमाणे माळेवर सर्पाची कल्पना केली की ती सर्प भासते व कल्पना निघून गेली की सर्प दिसेनासा हाेताे, त्याप्रमाणे भूतांची कल्पनारूप संध्याकाळ गेली की अखंड ब्रह्मरूपच राहते.अर्जुना, जमिनीतून आपाेआप काेंब निघतात का? घडे किंवा गाडगी आपाेआप तयार हाेतात का? कुंभाराच्या बुद्धीत आधी त्यांची निर्मिती हाेते, मग ते प्रकट हाेतात.समुद्राच्या पाण्यात तरंगांच्या खाणी आहेत काय? कापसाच्या पाेटात कापड असते काय? त्याप्रमाणे भूतसृष्टीची कल्पना नाहीशी झाली की, मी एकटाच उरताे. सूर्यकिरणांच्या आधारावर मृगजळची कल्पना हाेते. मी भूतसृष्टीशी एकरूप असताे हे मात्र खरे.