पत्र तेहतिसावे समर्थ म्हणाले - ‘नाही, फुले पांढरी हाेती.’ या वादाचा निकाल लागेना. मग ताे म्हातारा म्हणाला - ‘अहाे, मीच ताे हनुमान. मीच सीताशाेधाकरता अशाेक वनात गेलाे हाेताे. त्या वनातील फुले मी पाहिली ती तांबडी हाेती.’ समर्थ म्हणाले.‘हनुमानजी, तुम्ही अशाेकवनात गेला हाेता. त्या वनात सीतामाई हाेत्या. आज तुम्ही गुप्तरूपाने सीतामाईकडे जा व त्या काय म्हणतात ते मला उद्या येऊन सांगा. तुम्ही जे सांगाल त्यांच्यावर मी विश्वास ठेवताे.’ दुसरे दिवशी ताे म्हातारा गृहस्थ म्हणाला - काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुप्त रूपाने मी सीतामाईंकडे गेलाे. त्यांना आपला वाद सांगितला. त्या मला म्हणाल्या - ‘हनुमाना, अरे अशाेकवनात जी फुले हाेती ती पांढरीच हाेती, पण रावणाने मला पळवून नेल्यामुळे तू भयंकर रागावला हाेतास. त्या रागामुळे ती पांढरी फुले तुला तांबडी दिसत हाेती.अशाेकवनात पांढरी फुले हाेती असे समर्थ म्हणतात तेच बराेबर.’ *** या मार्मिक गाेष्टीचे तात्पर्य तू समजून घे. अगं, समर्थांच्यावर जे खूप रागावतात त्यांना रागाच्या भरात समर्थांच्या चरित्रात पांढऱ्याच्या ठिकाणी तांबडे दिसते.
*** समर्थांचे आडनाव ठाेसर. त्यांच्या आजाेबांचे नांव त्रिंबक, वडिलांचे नाव सूर्याजी. आईचे नाव राणूबाई. समर्थांचा जन्म शके 1530 चैत्र शुद्ध नवमी दिवसा बारा वाजता मराठवाड्यातील जांब गावी झाला. त्यांचे पाळण्यातील नाव नारायण.धुळ्याचे प्रख्यात समर्थभ्नत नानासाहेब देव यांनी असे म्हटले आहे कीसमर्थ रामाचे भ्नत. रामाचा जन्म चैत्रशुद्ध नवमी दिवसा बारा वाजता झाला. समर्थांचा जन्म देखील बराेबर त्याच वेळी झाला.असा चमत्कार झाला नाही.नानासाहेब देवांच्या म्हणण्याला पुस्ती जाेडून व त्यात दुरुस्ती करून असे म्हणता येईल कीज्ञानेश्वर कृष्णाचे भ्नत. कृष्णाच्या जन्म श्रावण वद्य अष्टमी रात्री बारा वाजता झाला. ज्ञानेश्वरांचा जन्म देखील श्रावण वद्य अष्टमी रात्री बारा वाजता झाला.
*** ज्या जांब गावी समर्थाचा जन्म झाला ते जांब गाव औरंगाबाद जिल्ह्यात, अंबड तालु्नयात, गाेदावरीच्या उत्तरेस तीन काेसावर, परतूड स्टेशनापासून दक्षिणेस सुमारे सहा काेसावर आहे.औरंगाबाद येथे जिल्हा न्यायाधीश असताना समर्थ जन्माच्या उत्सवासाठी मी त्या गावी मुद्दाम गेलाे हाेताे. ज्या ठिकाणी समर्थांचा जन्म झाला त्या ठिकाणी आता उत्तम समर्थमंदिर बांधण्यात आले आहे. तेथे फार माेठ्या जनसमुदायापुढे माझे प्रवचन झाले.प्रवचन करत असतांना मला एक आगळा नि वेगळा अनुभव आला. मला वाटत हाेते समर्थ स्वत: पडद्यामागून प्राॅम्टिग करत आहेत व मी बाेलताे आहे. त्यावेळचा आनंद शब्दांनी वर्णन करण्याचा पलीकडचा आहे.
मी त्या प्रवचनात एक विचार सांगितला. ताे विचार अगदी नवीन हाेता.