आपला व जगाचा संबंध कसा आहे हे दाखविणारी ही एक सिद्धांतवजा ओवी आहे. या सर्व जगाचे आदिस्थान निर्गुण, निराकार, निरवयव असले तरी ते स्वत:च्याच इच्छेने स्वत:च्या आनंदासाठी साकार व सगुण हाेते. मी या विश्वाचे बीज आहे.माझ्यापासून हे सर्व जग विकसित हाेत आहे. अप्रकट परमात्मा व प्रकट जगत यांचा संबंध कसा आहे हे या ओवीत स्पष्ट केले आहे. या ओवीतील मर्म ध्यानात घेण्यासाठी आधीच्या एकदाेन ओव्या पहाव्या लागतील.सूर्य जसा नेहमी सन्मुख असताे, तसा मी सर्वांच्या समाेर प्रकट आहे. काेठे नाही असे हाेतच नाही. आपली ही प्रकट अवस्था समजावून सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात की, दूध विरजले की त्याचे दही हाेते. त्याप्रमाणे माझ्यानावारूपाने जे प्रकटते ते विश्वच नाही काय? या दृष्टांतात एक प्रकारची उणीव आहे.
दुधापासून दही हाेते हे खरे. पण; दूध व दही एकाच वेळी वेगळे काढून दाखवता येत नाहीत. ही अपूर्णता भरून काढण्यासाठी ज्ञानेश्वर आणखी समर्पक दृष्टांत देताना दिसतात. एकाच बीजापासून अंकुर ुटताे. त्याला पाने, ुले, फळे लागतात. पण याही दृष्टांतात आणखी थाेडी उणीव राहिली आहे. बीजापासून अंकुर हा सांधा ध्यानात येताे हे खरे. पण अंकुरात बीज दाखवता येत नाही.
म्हणून आणखी एक दृष्टांत देऊन ज्ञानेश्वरांनी बहार केली आहे. एकाच भांगाराचे म्हणजे साेने साेन्याचे विविध प्रकारचे अलंकार हाेत नाहीत का? या ठिकाणी एकाच वेळेला त्याच कसाचे साेनेरी दिसते आणि अलंकारही दिसतात. याशिवाय साेन्याबराेबर अलंकारांची घडणावळ अधिकच असते.