पत्र बत्तिसावे
गीतेच्या गाभाऱ्यात तुला चिंतामणीबद्दलचा विचार सांगितला.कृष्णाचा हा साष्टांग चिंतामणी उत्तम आहे. अनुपम आहे व मांगल्याचे धाम आहे. हा चिंतामणी सुविचारांचे माहेर आहे, सज्जनांचे जिव्हार आहे व शारदेचे लावण्यरत्नभांडार आहे. या ठिकाणी चातुर्य शहाणे हाेते, प्रमेय रूचीस येते व सुखाचे साैभाग्य पाेखते. चंद्र तेथे चंद्रिका असते, शंभु तेथे अंबिका असते.सद्गुरू तेथे ज्ञान असते व ज्ञान तेथे आत्मदर्शन असते, त्याप्रमाणे चिंतामणी तेथे समाधान व आनंदाचे निधान असते.हा चिंतामणी तू आत्मसात कर म्हणजे आनंदाचा प्रकाश तुझ्या जीवनात पडेल व तुझे चित्त समाधान सराेवरात पाेहू लागेल. तुझा -राम पत्र तेहतिसावे प्रिय जानकी, तुझे पत्र पावले, तू आपल्या पत्रात लिहितेस - गीतेच्या गाभाऱ्यात तुम्ही मला ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांच्याबद्दल माैलिक माहिती सांगितली. आता कृपा करून समर्थ रामदासांच्याबद्दल बुद्धिवादाच्या चष्म्यातून माहिती सांगा.
*** समर्थांचे चरित्र समजून घेण्यास तू फार उत्सुक आहेस ही भाग्याची गाेष्ट आहे.काही काही लाेकांचा समर्थांच्यावर फार राग आहे. समर्थांच्या चरित्राकडे ते रागाने पाहतात. मग त्यांना पांढऱ्याचे तांबडे दिसते.पांढरा रंग सात्त्विकपणाचा आहे, तांबडा रंग तामसपणाचा आहे.समर्थांच्यावर कडाडून टीका करणाऱ्या लाेकांचे ज्वलज्जहाल लेख तू वाचले असशील. त्यात सात्त्विकतेऐवजी तामसीपणा दिसताे. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम या साधुसंतांच्या पंक्तीला रामदासांना बसवण्यास ते तयार नसतात. त्यांचा रागाचा पारा चढलेला असताे की त्यांना पांढऱ्याच्या ठिकाणी तांबडे दिसते.तुला एक मार्मिक गाेष्ट सांगताे. रामदास रामायण सांगत असत, लाेक माेठ्या आवडीने ते रामायण ऐकत असत. परंपरा अशी आहे की रामायण सांगत असताना एक पाट माेकळा असताे.
भाविकांची भावना अशी आहे की, जेथे जेथे रामायण सांगितले जाते, तेथे तेथे हनुमान येऊन बसताे. त्या हनुमानाकरता ताे पाट ठेवायचा असताे व ताे पाट माेकळा असला तरी त्या पाटावर हनुमान बसला आहे, अशी समजूत लाेक करून घेत असतात.समर्थ रामायण सांगत असताना एक तेजस्वी म्हातारा त्या पाटावर येऊन बसत असे. समर्थ त्या म्हाताऱ्याला नमस्कार करून रामायण सांगत असत.रामायण सांगत असताना समर्थ रंगून जात. समर्थ सांगत हाेते सीतेचा शाेध घेण्याकरता हनुमान अशाेकवनात गेला. त्या वनाचे नाव अशाेकवन हाेते, पण त्या वनात सीता शाेकमग्न हाेऊन बसली हाेती. त्या वनात जिकडे तिकडे पांढरी फुले फुलली हाेती.ताे म्हातारा गृहस्थ एकदम म्हणाला - ‘त्या अशाेकवनात जी फुले हाेती, ती पांढरी नसून तांबडी हाेती. पांढरी फुले फुलली हाेती, असे तुम्ही म्हणाला ते चूक आहे.समर्थ म्हणाले, ‘नाही, फुले तांबडी हाेती.’ ‘मी स्वत: त्या अशाेकवनात गेलाे नव्हताे, पण रामायणाचा सखाेल अभ्यास करून मी सांगताे की फुले पांढरी हाेती.’ ताे म्हातारा म्हणाला.नाही, फुले तांबडी हाेती.’