पाहें पां दूध पवित्र आणि गाेड। पासीं त्वचेचिया पदराआड।। परि तें अव्हेरूनि गाेचिड। अशुद्ध काय न सेविती।। 9.57

    26-Dec-2022
Total Views |


ज्ञानेश्वरांची प्रसिद्धी त्यांनी दिलेल्या दृष्टांतांबद्दलही आहे.त्यांच्या दृष्टांताचे एक महत्त्व असे की, दृष्टांत उच्चारताच सिद्धांत आपाेआप ध्यानी येताे. दृष्टांत व सिद्धांत एकमेकांशी मिळूनच असतात. या ओवीत ज्ञानेश्वर सांगतात की, सर्वांच्या हृदयात सर्व सुखांचा आराम असा मी राम असताना मला न जाणणारे भ्रांत पुरुषमात्र विषयसुखाची इच्छा करतात.या एका सिद्धांतासाठी ार सुंदर दृष्टांत दिलेले आहेत.दूध पवित्र व गाेड असे गायीच्या कांसेमध्येच असते; पण ते टाकून कासेला अखंडपणे चिकटून असलेली गाेचिड नेहमी रक्ताचेच शाेषण करीत असते किंवा असे पहा की, कमळ व बेडूक एकाच ठिकाणी रहातात; पण भ्रमर कमलपरागांचे सेवन करतात व बेडकाला मात्र चिखलच उरताे.

दुर्दैवी पुरुषाच्या घरी जमिनीत हजाराे माेहरा पुरलेल्या असल्या तरी त्याला ते माहीत नसल्यामुळे ताे दरिद्रीच राहताे. त्याप्रमाणेहृदस्थ मला न जाणता भ्रांत पुरुष बाह्य गाेष्टीकडे लक्ष देताे. खरे पाहता ज्ञान हे अत्यंत पवित्र, शुद्ध मनाला तल्लीन करणारे आहे.ते सुलभ उपायाने प्राप्त हाेते. मग ते सर्वांनाच सारखे का मिळत नाही. या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्णांनी आत्मज्ञानावर पुरुष श्रद्धा न ठेवता मृत्यूरूपी संसारमार्गात पुन्हापुन्हा रमतात, या विचारावर भाष्य करताना ज्ञानेश्वरांनी वरील दृष्टांतदिलेआहेत. मृगजळाने चूळ कशी भरावी? गळ्यात बांधलेला परीस ेकून द्यावा काय? याच वृत्तीने देहाभिमानी लाेक माझ्याकडे न येता संसारात रमतात.
 

Dyaneshwari