चाणक्यनीती

    26-Dec-2022
Total Views |
 
 

Chanakya 
 
2. पुत्र : एका कुळात अनेक मुले असू शकतात; परंतु जाे पुत्र सद्गुणी, सदाचारी, सुशिक्षित, सहृदयी, समाजाभिमुख असताे ताेच खरा आपल्या कुळाची प्रतिष्ठा जपताे; नव्हे ती वाढविताे. असा एकच सुपुत्र असला तरी पुरे. पुढे ताेच कुटुंबाचा आधार बनताे, घरातील वृद्धांची काठी बनताे आणि आपल्या परिवाराची सेवा करताे. अंध माता-पित्यांची कावड वाहून त्यांना तीर्थयात्रा घडविणाऱ्या श्रावणबाळाची कथा सर्वश्रुतच आहे.
 
बाेध : पुत्रसंख्येपेक्षा गुणी पुत्राची कामना करावी, अन्यथा ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी स्थिती हाेते. ‘बागबान’ सिनेमात, ‘नटसम्राट’ नाटकात हीच समस्या (आई- वडिलांना खरी गरज असताना त्यांना साेडणाऱ्या मुलाची.) मांडली आहे.