गीतेच्या गाभाऱ्यात

    26-Dec-2022
Total Views |
 
 

Bhagvatgita 
 
पत्र बत्तिसावे लाेकापवादामुळे प्रा. कर्व्यांच्या आईला आपल्या पाेटच्या मुलाला घरात घेता येईना व पर्नया घरी राहिलेल्या आपल्या मुलाची गाठ मध्यरात्री काळाेखातून जाऊन घ्यावी लागे.अंतकाळी आपला मुलगा आपल्याजवळ असावा, असे काेणत्या आईला वाटणार नाही ? पण लाेकापवादामुळे तिने मन मारले व आपल्या मुलाला आपल्या दुखण्याविषयी कळू दिले नाही.शेवटी प्रा. कर्वे यांना आपली आई आजारी असल्याचे कळले.ते तातडीने गावी निघाले, पण ते पाेचण्याच्या आदले दिवशीच त्यांची आई देवाघरी गेली.ही सारी हकिकत वाचत असताना आपल्या डाेळ्यातून पाणी येते.प्रा. कर्व्यांना ते दिवस फार दु:खाचे व चिंतेचे गेले. त्या अफाट व अपरंपार चिंतेमुळे एखादा मनुष्य वेडा झाला असता, पण प्रा. कर्व्यांनी आपली दृष्टी अंतर्मुख केली व अंतरंगातील देवाची मनाेभावे प्रार्थना केली. त्यामुळे त्यांच्या अंगात इतकी अमाप शक्ती निर्माण झाली की त्यांची चिंता निघून गेली व कल्पनातीत दु:खाच्या काळी देखील ते शांतिसुखाचा अनुभव घेत राहिले.
 
तुला सीतेची गाेष्ट माहीत आहे - ती बावनकशी शंभरटक्के शुद्ध हाेती. अग्नीमध्ये तिने आपले शुचित्व प्रस्थापित केले हाेते. ती गर्भार हाेती. अशावेळी रामाने तिचे डाेहाळे पुरवण्याचे ठरवले.लक्ष्मण तिला घेऊन वनात गेला. आपले डाेहाळे पुरवले जात आहेत म्हणून सीता आनंदात हाेती. वनात गेल्यावर लक्ष्मण डाेळ्यात पाणी आणून म्हणाला - ‘वहिनी, आता मी तुम्हाला खरे सांगताे. रामाने तुमचा त्याग केला आहे. आता तुम्हाला राजवाड्याचे दर्शन नाही. तुम्ही येथेच राहावयाचे आहे.’ ज्या रामावर सीतेने जीवापेक्षा जास्त प्रेम केले त्याच रामाने सीतेचा त्याग केला हाेता. राजवाड्यात गर्भारपणी काैतुक हाेऊन दिवस जाण्याच्या ऐवजी तिला वनात राहणेची पाळी आली हाेती.त्यापेक्षा स्त्रीच्या जीवनांत आणखी दु:ख ते काय असणार ? चिंतेमुळे वेडे हाेण्याची ती वेळ हाेती, पण अशा वेळी - सीतेने अंतरंगातील देवाची प्रार्थना केली.
 
तिच्या अंगात कल्पनातीत शक्ती निर्माण झाली. तिचे विचार बदलले. ती लक्ष्मणाला म्हणाली - ‘भावाेजी, डाेळे पुसा. मी शुद्ध आहे याची रामाला खात्री आहे. पण लाेकानुरंजन हे रामाचे ब्रीद असल्यामुळे त्याने माझा त्याग केला. भावाेजी, रामाला सांगा की, मला वाटेल तितके दु:ख हाेऊ दे मी आनंदाने ते दु:ख भाेगण्यास तयार आहे. माझी एवढीच इच्छा आहे की, मला वाटेल तेवढे दु:ख झाले तरी चालेल पण माझ्या रामाचा कीर्तिध्वज यावच्चंद्रदिवाकराै या जगात फडकू दे -’ तू हा महामंत्र लक्षांत ठेव की -- अंतरंगात जाे देव आहे त्याची अनन्यभावे प्रार्थना केली व आपली दृष्टी अंतर्मुख केली म्हणजे आपल्या अंगात दिव्य शक्ती निर्माण हाेते व त्यामुळे आपली चिंता पळून जाते. साधु संतांना अंतरंगातील दिव्यशक्तीचा स्पर्श झाल्यामुळे ते चिंतामुक्त झाले व त्यांना जिकडे तिकडे आनंद दिसू लागत