अनेक वेगवेगळ्या याेनींमध्ये जन्म घेतल्यानंतर शेवटी पुण्याईनेच मनुष्यजन्म प्राप्त हाेताे. त्या त्या याेनीमध्ये जीव असताना त्याला विचार करण्याची बुद्धी नसते. पशु, पक्षी, किडे, मुंगी अशा खालच्या अनेक याेनी आहेत. त्यामध्ये दु:खच भाेगावे लागते आणि शिवाय विचारश्नती नसल्याने त्यामध्ये जीवाचे हित करून घेण्याची इच्छाही हाेत नाही मग त्याचा मार्ग मिळणे लांबच. अशी श्नती, बुद्घी आणि त्यानुसार आपल्या विचारांना, उच्चारांना आणि आचारांना वेगळे वळण देण्याची क्षमता फ्नत मनुष्यजन्मातच प्राप्त हाेऊ शकते.श्रीसमर्थ म्हणतात की, हा दुर्लभ असा नरदेह माेठ्या मुश्किलीने आणि पुण्याईने प्राप्त झालेला आहे. त्याचा खरा लाभ घ्यायचा असेल, तर ताे केवळ परमेश्वरप्राप्ती करूनच घेता येईल. खाणेपिणे, गाणे बजावणे, देहाचे सुखाेपभाेग हा लाभ शाश्वत नाही. खरा लाभ भगवंतप्राप्तीचा आहे आणि ताे करून घेणे केवळ मनुष्यजन्मातच श्नय आहे.
जे ऐहिक सुख वाटते ते किती अशाश्वत व क्षणभंगुर असते ते अनेक उदाहरणांनी त्यांनी स्पष्ट केले आहे. धनधान्य, वैभव, घरेदारे ही केव्हाही आपत्ती आली की क्षणार्धात नाश पावू शकतात. माता-पिता, पुत्र-कन्या, भाऊ-बहिणी इतकेच काय प्रत्यक्ष सहधर्मचारिणी पत्नीही अनेकदा केवळ सुखाचे भागीदार असतात, हे प्रत्ययास येते.आपल्या तपस्येने पूज्य ऋषीपदी विराजमान झालेल्या वाल्मीकी ऋषींच्या पूर्वायुष्यातील गाेष्ट माहीतच आहे.ते वाल्याकाेळी असताना त्यांनी लुटीचे आणि हत्येचे पाप वाटून घेण्यास काेण तयार आहे, असे विचारल्यावर पत्नीसह अपत्यांनीही नकारच दिला हाेता ना?