देह प्रारब्धावर, मन भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावे

    24-Dec-2022
Total Views |
 
 

gondavlekar 
नामचे साधन कसे करावे? एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी ओतले तर ताे दगड नुसता भिजेल आणि पाणी निघून जाऊन काेरडा हाेईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भाेक पडेल, आणि काही दिवसांनी दगड ुटूनही जाईल, त्याप्रमाणे केव्हातरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का हाेईना पण नित्यनेमाने, ठराविक वेळी, आणि शक्य तर ठराविक स्थळी, जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक हाेते. जात्याला दाेन पेठी असतात, त्यांतले एक स्थिर राहून दुसरे िफरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते, पण जर दाेन्ही पेठी िफरत राहीली तर दळण दळले न जाता ुकट श्रम मात्र हाेतात. माणसाची शरीर आणि मन अशी दाेन पेठी आहेत. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गाेष्टी कराव्यात.
 
प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असताे. प्रारब्धरूपी खुंटा देहरूपी पेठ्यात बसून प्रपंचाच्या गाेष्टी करव्यात.प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असताे. प्रारब्धरूपी खुंटा देहरूपी पेठ्यात बसून ताे त्याला िफरवताे, आणि मनरूपी पेठे स्थिर असते. देह प्रारब्धावर साेडावा, आणि मन भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावे, याहून नामाचे साधन दुसरे काय हे साधन अमक्यालाच साधेल असे नाही, ते काेणालाही साधेल. गरिबाला गरिबीचे दु:ख हाेते म्हणून साधत नाही, तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लाेभ असताे म्हणून साधत नाही, विद्वानाला विद्येचा अभिमान हाेताे म्हणून साधन तनाही, तर अडाण्याला काय करावे हे समजत नाही म्हणून साधत नाही.साशंक वृत्तीने कितीही साधन केले, कितीही नामस्मरण केले, तरी कधी समाधान हाेणार नाही.
 
गुरूचरणी अत्यंत विश्वास। आणि साधनाचा अखंड सहवास। येथे प्रपंचाचा सुटला ास। हाच परमार्थाचा मार्ग आहे खासŸ।। नीतिधर्माचे आचरण, शास्त्रशुद्ध वर्तन, शुद्ध अंत:करण, आणि भगवंताचे स्मरण, इतक्या गाेष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पाेचेल, आण शेवटपर्यंत ताे पाेचला तरच ायदा. घरी पाेचल्यावर पत्र लिहा असे म्हणतात याचा अर्थ हाच आहे.प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येतात, त्याचप्रमाणे परमार्थ करीत असतानाही वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही. ज्यावेळी वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाम घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. दृढ विश्वासाने नाम चालू ठेवावे. जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तिथेच समाधानाची प्राप्ती हाेते. ‘भगवंता, मी तुझा आहे,’ असे रात्रंदिवस म्हणत गेल्याने भगवंत प्रकट हाेत जाईल, आणि भगवंत जितका प्रकट हाेत जाईल तितके मीपणाचे दडपण आपाेआप कमी हाेत जाईल.