चाणक्यनीती

    24-Dec-2022
Total Views |
 
 

Chanakya 
 
वाच्यार्थ: ज्याप्रमाेणे सुगंधी पुष्पांनी बहरलेला एखादा उत्तम वृक्ष सगळ्या जंगलाला (आसपासच्या वन प्रदेशाला) सुगंधित करून टाकताे, त्याप्रमाणे एखादाच सुपुत्र संपूर्ण कुळाची प्रतिष्ठा वाढविताे.
 
भावार्थ : येथे चाण्नयांनी सुपुत्राची तुलना सुवृक्षाशी केली आहे.
 
1. वृक्ष : जंगलात अनेक वृक्ष असतात; विविध जातीचे, नाना प्रकारची फुले येणारे इ. फुलांनी बहरलेला वृक्ष जसे गुलमाेहर, पळस, पांगारा दिसायला अतिशय मनाेवेधक असतात; पण जवळ गेल्यावर त्याचे रंग, रूप दिसते. सुगंध येत नाही. मात्र सुगंधी फुलांचे तसे नसते. पारिजात, बकुळ, साेनचाफा, बूच(बकाणी) आदी वृक्षांची फुले आपल्या सुगंधाच्या दरवळाने संपूर्ण रान भरून टाकतात. त्यांचे जंगलातील अस्तित्व त्यांच्या प्रसन्न करणाऱ्या सुवासानेच जाणवते. अशा फुलांनी बहरलेला एकच वृक्ष आसमंत सुगंधित करण्यासाठी पुरेसा असताे.