गीतेच्या गाभाऱ्यात

    24-Dec-2022
Total Views |
 
पत्र बत्तिसावे
 
 

Bhagavtgita 
साऱ्यांच्या चिंता नाहीशा करणे हेच माझे काम-’ कृष्णाची चिंता एवढी विस्तृत हाेती की या विस्तृत चिंतेमुळे ताे स्वत:च चिंतामणी झाला.कृष्णासारखा चिंतामणी या जगात झाला नाही. कृष्णाला तू समजून घे व दुसऱ्याच्या चिंता नाहीशा करण्याचा प्रयत्न कर म्हणजे जादूची कांडी फिरवावी त्याप्रमाणे तुझी चिंता देखील नाहीशी हाेईल. हा दिव्य मंत्र आहे. या मंत्रामुळे सहारा वाळवंटात पाणी मिळाल्यावर जसा आनंद हाेताे तसाच आनंद हाेताे.
 
6
 
साष्टांग चिंतामणीच्या सहाव्या अंगाचा विचार असा आहे कीएकदा प्रश्न निर्माण झाला म्हणजे साधकबाधक गाेष्टीचा विचार न करता आपण तडकाफडकी निकाल करताे व घाेटाळा करून ठेवताे. घाेटाळा हे चिंतेचे एक प्रमुख कारण आहे.युद्धारंभी अर्जुनाने साधकबाधक गाेष्टींचा विचार न करता काही गाेष्टी मनाने ठरवल्या व विचारांचा सारा घाेटाळा निर्माण केला. या घाेटाळ्यामुळे ताे पराकाष्ठेचा चिंताग्रस्त झाला.चिंता कशी दूर करावी याबद्दल खूप विचार करणाऱ्या हर्बर्ट ह्नसने म्हटले आहे Confusion is a great cause of worryघाेटाळा हे चिंतेचे महान कारण आहे.माझा एक मित्र आहे. ताे साधकबाधक गाेष्टींचा विचार न करता नेहमी घाेटाळा करताे व चिंताग्रस्त हाेताे.
 
जरा डाेके दुखू लागले की त्याला वाटते आपल्याला ब्लड प्रेशरचा विकार जडला आहे व या विचाराने ताे चिंताग्रस्त हाेताे. जरा काेठे कळ आली की त्याला वाटते की आपणाला हार्ट डिसीज आहे आणि या भावनेने ताे चिंतामग्न हाेताे.एकदा त्याला कसेसेच हाेऊ लागले. ताे डाॅ्नटरकडे गेला.तेथे एक पुस्तक पडले हाेते. एका पानावर काही लक्षणे दिली हाेती. त्याने ती लक्षणे वाचली व डाॅ्नटरांना म्हटले- या पानावर जी लक्षणे दिली आहेत ती मला हाेत आहेत.ही लक्षणे काेणत्या राेगाची आहेत हे पहा. ताे राेग मला नक्की झाला आहे. त्याच राेगावर मला औषध द्या, डाॅ्नटर हसून म्हणाले- ‘संपूर्ण वाचा. अहाे, त्या राेगाचे नाव आहे ‘बाळंतराेग’ तुम्हाला का बाळंतराेग झाला आहे.तू असे लक्षांत घे की- निर्णय घेण्याची घाई करण्यामुळे चिंता निर्माण हाेते, आपण निर्णय घेण्याची घाई करू नये.
 
7
 
साष्टांग चिंतामणीच्या सातव्या अंगाचा विचार असा आहे की - आपली चिंता दूर करण्याची खरीखुरी इच्छा निर्माण झाली म्हणजे मार्ग सापडताे. इंग्लिशमध्ये एक सुभाषित आहे.Where there is a will, there is a way जेथे इच्छा आहे तेथे मार्ग आहे.चिन्ता दूर करण्याचे नुसते बेत आखण्याने उपयाेग हाेत नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष आचरण केले पाहिजे. भूक लागली असताना पंचपक्वान्नांचा नुसता बेत भागत नाही, तर भूक भागवण्याकरिता काेणते तरी अन्न खाल्ले पाहिजे.माणसाजवळ काही वैगुण्ये असतात, पण प्रयत्न सुरू केला म्हणजे असा अनुभव येताे की