ज्या इंद्रियाशी लक्ष जुळलेलं असतं. तेच इंद्रिय सार्थक. सफल असतं.सक्रिय. सशक्त असतं. लक्ष कुणाचं असतं? ते मालकाचं असतं. इंद्रिये फक्त इंस्ट्रुमेंटस्.उपकरणे आहेत. गुलाम आहेत.पण हे थाेडे खाेलात जाऊन पाहावे लागेल.आपण जेव्हा काेणाला पाहता. सध्या जसे मला पाहता आहात. तेव्हा लक्ष द्या की, डाेळे पाहत आहेत की तुम्ही पाहत आहात? तुम्ही पाहत असाल तर डाेळे हे फक्त मधला दरवाजा आहेत.पलीकडे आपण आहात. आणि ज्याला आपण पाहताहात ताे मी नाहीये. तेही माझे दरवाजे आहेत. जे आपण पाहताहात ताे मी इकडे आहे.जेव्हा दाेन माणसे भेटतात तेव्हा दाेन्ही बाजूला आत्मे असतात. आणि दाेहाेंच्या मध्ये साधनांची दाेन जाळी असतात. जेव्हा मी हात पुढे करताे.
आणि तुमचा हात माझ्या हातात घेताे. तेव्हा हाताद्वारे मी माझ्या आत्म्यानं आपणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताे. हात हे तर केवळ साधन आहे. आपण जर त्या साधनांना आत्मा समजून बसलाे. तर कृष्णाला जी मालकी अभिप्रेत आहे.ती कधीच पूर्ण हाेणार नाही.
साधनांना साधनेच समजा. स्वतःला वेगळे पाहा. रस्त्याने चालताना भान ठेवा की, शरीर चालत आहे. आपण चालत नाही. आपणकधीच चाललेलाे नाही. आपण चालूही शकत नाही.एखाद्या चालत्या कारमध्ये काेणीतरी बसताे तसेच आपणही आपल्या शरीरात बसलेले असता. त्या माणसाचा प्रवास हाेईल. पण ते जागा साेडणार नाही. साेडू शकणार नाही. अशी यात्रा आपली पुष्कळच हाेऊन जाते. पण चालते ते मात्र शरीरच. आपण नेहमी बसलेले असता. ताे जाे आत बसलेला आहे त्याचं भान नेहमी ठेवा. ताे तर चालत नाहीये. ताे कधीच चालत नसताे.