चाणक्यनीती

    23-Dec-2022
Total Views |
 
 

Chanakya 
 
4. मधुरभाषी : काही लाेक अतिशय गाेड आवाजात आणि साैम्य शब्द वापरून बाेलतात.इतरांशी बाेलताना त्यांना काय प्रिय आहे, काय आवडते याचा विचार करून त्याप्रमाणे बाेलतात. अशावेळी समाेर कुणीही व्य्नती असली, तरी ती खूशच हाेणार. म्हणून अशी व्य्नती इतरांना चटकन आपलेसे करून घेते. तिच्यासाठी काेणी परके राहत नाही. म्हणूनच म्हणतात ‘लाडू, जिलेबी’पेक्षाही, ‘‘सबसे मीठे, मीठे बाेल.’’ बाेध : समर्थ, साहसी, सुविद्य आणि गाेड बाेलणाऱ्या (चतुर) व्य्नतींना काहीच अश्नय नसते.