आज खून, मारामारी, बलात्कार असे गुन्हे लाेक आवेशात येऊन नव्हे, तर पद्धतशीर कट करूनच करतात.याची अनेक उदाहरणे देता येतील. ही विकृत मनाेवृत्ती बदलण्याचा एकमेव उपाय भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ आहे.भगवद्गीता म्हातारपणात नव्हे, तर बालपणापासून वाचावा असा महान ग्रंथ वाचणे हा आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना निदान पाचव्या इयत्तेपासून भगवद्गीता प्रादेशिक भाषांमध्ये शिकविण्याची गरज आहे.आपल्या देशात 17 व्या शतकात हाेऊन गेलेल्या फ्रान्सच्या राजाने काय केले, त्याचा इतिहास आपल्या अभ्यासक्रमात आहे. पण राजा पाेरस, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजीमहाराज या सारख्या महापुरुषांच्या चरित्राचा अभ्यासक्रमात समावेश नाही, ही अतिशय खेदाची बाब आहे.
गीता एक महान तत्त्वज्ञान आहे.सुदैवाने आज भगवद्गीता उर्दूसहित देशातील सर्वच भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक तरुणाने भगवद्गीता वाचून त्यावर विचार करण्याची नितांत गरज आहे. ‘निष्काम कर्मयाेग’ यासाठी उपयु्नत आहे.मुलांच्या आई-वडिलांनी मुलांना दरराेज जमले नाही तरी दर रविवारी किमान एक तास तरी मुलांना भगवद्गीतीचे मर्म समजावून सांगण्याची आज नितांत गरज आहे. निदान प्रयत्न तर करून पाहा, न्नकीच सकारात्मक परिणाम दिसून येतील.