गीतेच्या गाभाऱ्यात

    22-Dec-2022
Total Views |
 
 
पत्र बत्तिसावे
 

Bhagvatgita 
 
3 तिसऱ्या अंगाचा विचार असा आहे कीआपणाजवळ काय नाही, याचाच आपण सारखा विचार करताे व आपणाजवळ काय आहे त्याचा आपण विचार करत नाही. त्यामुळे आपण चिंतेने पछाडताे. आपणाजवळ काय नाही याचा विचार घेऊन आपण चिंताग्रस्त झालाे म्हणजे आपणाजवळ काय आहे याचा आपण जाेरात विचार सुरू करावा म्हणजे आपल्या मनाच्या वाड्यातून चिंता आपले बिऱ्हाड हलवते व म्हणते बिऱ्हाड करायला हा वाडा याेग्य नाही.गीता व उपनिषदे याबद्दल ज्याला जास्तीत जास्त प्रेम हाेते व त्याच्यामुळे आपणाला मन:शांती प्राप्त झाली असे ज्याने सांगितले त्या शाेपेनहाॅवरने म्हटले आहेWe seldom think of what we have, we always think of what we lack(आपणाजवळ काय आहे याचा आपण क्वचितच विचार करताे; आपणाजवळ काय नाही याचा आपण सदा विचार करताे.) परमार्थात एक सुंदर गाेष्ट आहे.
 
एक लक्षाधीश मनुष्य हाेता. त्याचा बंगला हाेता. त्याचा एक मित्र हाेता. त्या मित्राचे दाेन बंगले हाेते. ताे मित्र दाेन लाखांचा धनी हाेता.
त्या माणसाला वाटायचेआपल्या मित्राचे दाेन बंगले आहेत. त्याच्याजवळ दाेन लाख रुपये आहेत. मला एकच बंगला आहे. मी एकचलाखांचा धनी आहे.ताे मनुष्य आपल्या मित्राच्या इस्टेटीचा सारखा विचार करी व सदान्कदा दु:खी व चिंताग्रस्त असे. त्याला रात्री सुखाने झाेप ेखील येत नसे. त्याच्या बंगल्याच्या शेजारी एका झाेपडीत एक मनुष्य राहत असे ताे आनंदी असे. रात्रीच्यावेळी देवाची प्रेमाने भजन गात ताे आनंदाने झाेपी जात असे.त्या माणसाला वाटले- ‘‘आपण इतके दु:खी कसे? व हा झाेपडीवाला सुखी कसा?’’ ताे त्या झाेपडीवाल्याकडे गेला व त्याने विचारले.‘‘तू इतका आनंदी कसा?
 
तुला चिंता कशी वाटत नाही?’’ ताे झाेपडीवाला म्हणाला- ‘‘चिंता वाटण्याचे कारण काय? देवाने मला हातपाय दिले आहेत. दिवसा मी काम करताे. मला पाेटापुरते मिळते. रात्री देवाचे भजन करत मी आनंदाने झाेपताे.’’ 4 साष्टांग चिंतामणीचे चवथे अंग असे आहे कीकुविचारामुळे चिंता निर्माण हाेते व सुविचाराने ती निघून जाते. आपले मन असे चमत्कारिक आहे की त्याला वाईटविचारकरण्याची खाेड असते. ही खाेड जाण्याकरिता माणसाने जास्तीत जास्त चांगले विचार करावेत. सुविचारांत फार माेठी श्नती असते.सुविचाररूपी घाेड्यावर आपण स्वार झालाे म्हणजे नरकाचा देखील आपणाला स्वर्ग करता येताे. त्याच्या कुविचाररूपी घाेड्यावर आपण स्वार झालाे म्हणजे स्वर्गाचा देखील नरक हाेताे.गीता व उपनिषदे यांनी सुविचारावर फार भर दिला आहे.वैदिक ऋषी असा विचार करत की, आपण देवच आह