तरुणसागरजी

    21-Dec-2022
Total Views |
 
 

tarunsagarji 
दहा गायी दान करणे माेठे पुण्याईचे काम आहे, पण कत्तलखान्यात चाललेल्या एका गाईला वाचवणे हे त्यापेक्षाही माेठे पुण्य आहे. दहा मंदिरं बांधण्यापेक्षा एका प्राचीन मंदिराचा जीर्णाेद्धार करणे खूप माेठे पुण्य आहे. एखाद्या हिंसावादी मनुष्याला अहिंसावादी बनवणे हे कितीतरी पटीने पुण्याईचे काम आहे. तुम्ही जर एखाद्या मांसाहारी व्यक्तीला शाकाहारी बनवू शकलात तर समजा की, तुम्ही चार-धामाची यात्रा करण्याचे पुण्य पदरात पाडून घेतले.