भगवंत भावाचा भुकेला। भावार्थ देखाेन भुलला ।।2।।

    21-Dec-2022
Total Views |
 
 

saint 
 
मात्र, अभिमानामुळे ज्यांच्या मनात श्रद्धा नसते, भाव नसताे, परमेश्वराबद्दल आस्त्निय बुद्धीही नसते असे दीनवाणे व अभागी लाेक मात्र प्रवाहपतित हाेऊन भवसागरातच गटांगळ्या खात वाहत जातात.आपल्या वेळेला मित्र किंवा अगदी जवळचा आप्तही एखाद्या वेळी मदतीला येणार नाही; पण ‘देव भावाचा भुकेला’ हे सत्य सर्वच संतांनी सदैव सांगितले आहे; त्यामुळे भ्नताने तळमळीने साद घातली आणि भगवंताने धाव घेतली नाही, असे कधीच हाेत नाही. भ्नताला भेटण्याची भगवंतालाही तळमळ असते.त्यामुळे भ्नत भगवंतासाठी दाेन पावले चालला, तर भगवंत चार पावले पुढे येताे. हीच भावना व्यक्त करताना श्रीसमर्थ सांगतात की, भगवंत सदैव भावाचा भुकेला आहे. भाव मात्र शुद्ध व श्रद्धायुक्त पाहिजे.
 
भाव जेवढा शुद्ध, स्थिर आणि पूर्ण असेल, तर परमेश्वर प्रचितीही तेवढीच शुद्ध, स्थिर आणि पूर्ण असते. म्हणून तशा तऱ्हेचा भाव ठेवणाऱ्याची भ्नती पाहून भगवंत संतुष्ट हाेताे आणि भ्नताची हाक ऐकून त्वरित धाव घेऊन त्याला प्रसन्न हाेताे आणि त्याची संकटातून मु्नतता करताे. भवराेग हे सर्वांत माेठे संकट आहे. त्यातून मु्नत हाेण्यासाठी तितकाच दृढ भाव व भ्नती आवश्यक आहे आणि जाे भ्नत असा भाव ठेवेल त्याला प्रसन्न हाेऊन परमेश्वर त्याची ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं’ या दुष्टचक्रातून निश्चित सुटका करेल! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299