ओशाे - गीता-दर्शन

    21-Dec-2022
Total Views |
 
 

Osho 
 
तारुण्यात जेव्हा इंद्रिय प्रबळ असतात तेव्हा घाेषणा करायची संधी असते. आता आपलं पाेटं बिघडलं आहे.आपण लिव्हरचे राेगी बनला आहात. जेवता येत नाही. मग आपण म्हणता, मी तर भाेजनावर विजय मिळवला आहे... आता आपण फ्नत द्रव पदार्थ घेत आहात, का तर दात नाहीत. धड चावता येत नाही.आणि म्हणता मी भाेजनावर विजय मिळवला. या सगळ्या घाेषणा पलंगाखाली लपून गाजवलेली मर्दमुकीच आहे. यानं भागणार नाही. आपण फ्नत स्वतःला फसवीत आहात. इंद्रियांना सामाेरे गेले पाहिजे. जाेवर ती प्रबळ आहेत ताेवर तेव्हाच त्यांना जिकलं तर त्याबाबतचं रहस्य आहे. श्नती आहे.जेव्हा इंद्रिये दुबळी झालेली असतात. त्यांच्यात काही श्नती राहिलेली नसते. आता त्यांच्या हरण्याचा मार्ग राहिलेला नाही. म्हणून तेव्हा त्यांना जिंकण्यात काहीच अर्थ नाही.
 
कृष्ण म्हणताे, जाे इंद्रियांचा मालक आहे...’ आणि एखादा माणूस इंद्रियांचा मालक केव्हा हाेताे? इंद्रियांवरच्या मालकीबद्दलची दाेन सूत्रे आपणास सांगताे. म्हणजे हे सूत्र आपणास पूर्णपणे समजेल.पहिली गाेष्ट म्हणजे जाे काेणी स्वतःला इंद्रियांपासून वेगळा जाणताे. ताेच इंद्रियांचा मालक हाेऊ शकताे, नाहीतर ताे मालक हाेईलच कसा? आपण ज्याच्यापासून भिन्न असताे.त्याचेच मालक असू शकताे. ज्याच्यापासून आपण भिन्न नाही. त्याचे आपण मालक हाेऊच कसे? पण आपण आपणाला इंद्रियांपासून वेगळे मानतच नाही. आपण इंद्रियांशी इतके आयडेंटिंटी, तादात्म्य करून आहाेत की, आपण इंद्रियेच आहाेत. इतर काेणीही नाही असं आपल्याला वाटतं. तेव्हा ज्या कुणाला इंद्रियांवर मालकी मिळवायची आहे. त्याने इंद्रिये आणि आपण स्वतः यात एक गॅप.