आपण सर्वत्र कसे भरलेले आहाेत, हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनास समजावून सांगत आहेत.आपल्या अस्तित्वाची प्रतीती भक्तास कशी येते याचाही निर्देश ते करतात. किंवा आपण सर्वत्र असून लाेकांना कसे दिसत नाही हेही ते सांगतात.आत व बाहेर सर्वत्र अंधार असल्यामुळे जवळ असूनही मला ते ओळखत नाहीत. मला विसरून सर्वसामान्य लाेक इतर देवदेवतांच्या नादी लागतात. विषयसुखासाठी दीन हाेऊन ते देवांचा शाेध घेतात. विषयभाेगासाठी देवांची ते सेवा करतात. विधिनिषेधाची काळजी घेतात. ज्या देवतेचे भजन करतात ती त्यांना पावत असेलही. प्रत्येक देवतेच्या ठिकाणी त्यांचा भाव निराळा असताे. ज्या इच्छेने ते आराधना करतील ती त्यांची इच्छा सफल हाेतेही. पण अर्जुना, लक्षात ठेव की, देवांचे भजन करणारे देवांना मिळतात व माझे भजन करणारे मला प्राप्त हाेतात. मला न जाणणारे माझे भक्त विषयसुखाचे फळ चाखतात.
इतर देवतांची प्राप्ती झाली तरी माझ्या लाभासाठी त्याने माझ्याकडेच लक्ष द्यावयास हवे. म्हणजे त्याला परम लाभ हाेईल.अमृताच्या सागरात बुडाल्यावर ताेंड मिटून कसे भागेल? अमृत पिऊन सुखाने अमृतातच रहावे.सर्वत्र अमर्याद पसरलेल्या चिदाकाशातआनंदाने संचार करणाऱ्या माझ्या भक्तास सुखाचा अपार लाभ हाेताे. हे माझे बाेलणे विचार करण्यासारखे असले तरी जीवाला विशेष आवडत नाही. ताे कर्मकांडाच्या ेऱ्यात अडकूनच पडताे. कारण, यांच्या डाेळ्यांत याेगमायेचे पटल असल्यामुळे ते आंधळे झालेले असतात.
मी ार मर्यादित आहे अशी त्यांची समजूत असल्यामुळे ते मला पाहू शकत नाहीत. नाहीतर मी नाही अशी वस्तूच जगामध्ये नाही. पाणी रसावाचून असू शकते का? वारा काेणत्या वस्तूला स्पर्श करीत नाही? तसे या सर्व जगात मीच एक भरून असताे.