पत्र एकाेणतीसावे तुला एक गुह्य सांगू? मूल लहान असताना आई त्याच्यावर जी भ्नती करते ती निष्काम असते. मुलाने आपल्याला काही द्यावं, अशी माऊलीची इच्छा नसते. उलट आपणच सारे काही त्याला द्यावे व त्यातच परमानंद मिळवावा अशी मातेची भावना असते. मूल माेठे झाले म्हणजे मात्र आईसुद्धा मुलापासून अपेक्षा करू लागते. त्याने आपली सेवा करावी. त्याने आपली अमुक अमुक इच्छा भागवावी असे तिला वाटू लागते व तिच्या भ्नतीला सकाम भ्नतीचे रूप येऊ लागते. म्हणूनच काल्याच्या कीर्तनाच्या वेळी कृष्णाचे बालपणाचे जीवन वर्णन केले जाते त्या वेळी साऱ्या लाेकांनी कृष्णावर जी भ्नती केली ती निष्काम भ्नती हाेती.भ्नती जेव्हा सकाम हाेते, तेव्हा ताे जीवनाचा व्यापार हाेताे आणि भ्नती जेव्हा निष्काम हाेते तेव्हा ताे जीवनाचा आधार हाेताे.
गाेकुळ वृंदावनात कृष्णाने पुतनावध, शकटासूरवध, धेनुकासुरवध, वृचमासुरवध, कालियामर्दन - वगैरे पराक्रम केले. पण तू असे लक्षात घे की - लहानपणी कृष्णाने साऱ्या लाेकांच्या हृदयात जे स्थान मिळवले हाेते त्याचे कारण पराक्रम नसून आपला सारा श्रेष्ठ भाव विसरून ताे त्या लाेकांशी एकरूप झाला हाेता हे हाेय.मनुष्य विद्वान असला तर लाेक त्याचेबद्दल आदर बाळगतील.मनुष्य पराक्रमी असला, तर लाेक त्याचेबद्दल भय बाळगतील.मनुष्याने आश्चर्यकारक कृत्य केले तर लाेक आश्चर्यचकित हाेतील पण लाेक अशा माणसाला आपले अंत:करण अर्पण नाही करणार.अंत:करणाची गाेष्ट अशी आहे की अंत:करण द्यावे, अंत:करण घ्यावे. कृष्णाने स्वत:चा माेठेपणा विसरून लाेकांना अंत:करण दिले व लाेकांनी देखील त्याला आपले अंत:करण दिले.
लेनिनची गाेष्ट अशी सांगतात की एका ठिकाणी त्याचे व्याख्यान ठरले हाेते. ठरलेल्या वेळेच्या आधी ताे श्राेत्यात येऊन बसला व सामान्य लाेकात ताे मिसळून गेला. त्याचे नाव पुकारल्यावर ताे सामान्य लाेकातून उठला व व्यासपीठाकडे गेला. ताे प्रकार पाहून मॅ्निझम गाॅर्कीने म्हटले की लाेकांच्या जीवनात लेनिन समरस झाल्यामुळे ताे साऱ्या लाेकांचा कंठमणी हाेऊन बसला. कृष्णाचे जीवन तू समजून घेतलेस म्हणजे तुला समजून येईल कीसामान्य लाेकांच्या जीवनात कृष्ण इतका समरस हाेऊन गेला हाेता की या बाबतीत जगाच्या ऐतिहासिक व्य्नतीमध्ये त्याला अंगुलीस्थान द्यावे लागेल. गाेवर्धन पर्वताची जी गाेष्ट कृष्णाच्या जीवनात सांगण्यात आली आहे त्यावरून असे दिसते कीगाेपांनी काठ्या लावून पर्वत उचलला व कृष्णाने त्याकामी आपल्या करंगळीचा आधार दिला. या गाेष्टीचे तात्पर्य असे की माणसांनी माेठ्या कामाचा पर्वत आपल्या प्रयत्नांच्या काठ्यानी उचलावा पण त्या बाबतीत देवाच्या करांगुलीचा आधार घ्यावा.
आपण खूप प्रयत्न करावा पण त्या बाबतीत देवाचे अधिष्ठान विसरू नये म्हणूनच समर्थ रामदास म्हणतातसामर्थ्य आहे चळवळीचे । जाे जे करील तयाचे। परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे।। कृष्णाने कंसाला ठार मारले, त्यावेळी ताे अठरा वर्षांचा हाेता. कंसाला मारून कृष्णाने उग्रसेनाला बंदिखान्यातून साेडवले तेव्हा उग्रसेनाने कृष्णाला मथुरेचे राज्य देऊ केले, पण कृष्णाने उग्रसेनासच राजा केले. राजा हाेण्याची संधी कृष्णाला पुष्कळ वेळा आली हाेती, पण त्याने राजा हाेण्याचे नाकारले. त्याने वसुदेवास विधिपूर्वक राज्याभिषेक करविला. बलरामाची युवराजपदी स्थापना केली. सात्यकीला सेनापती केले व सांदिपनींना राजपुराेहित नेमले.