गीतेच्या गाभाऱ्यात

    19-Dec-2022
Total Views |
 
 
पत्र एकतिसावे
 

bhagvatgita 
 
खूप श्राेते पुराण ऐकण्यास आले हाेते. वाड्यात आत देवघरात हरिची मूर्ति हाेती, बाहेर हरि पुराण सांगत हाेता.त्या पुराणात पांडित्याची प्रभा हाेती. पण भ्नितप्रेमाचा सुवास दरवळत नव्हता.नाथांचे पुराण श्राेत्यांच्या हृदयाला जाऊन भिडत असे.हरिचे पुराण श्राेत्यांच्या डाे्नयावरून जाऊ लागले. परिणाम व्हायचा ताेच झाला. एकेक श्राेता वाड्यातून निघून जाऊ लागला. शेवटी दाेनच लाेक राहिले.आत हरि, बाहेर हरि.पुढे हरिपंडिताला आपल्या वडिलांचे माेठेपण कळले.त्यांची खात्री झाली कीनाथ म्हणजे हे विश्वचि माझे घर। ऐसी मती जयाची स्थिर। असे आहेत. आता हरिपंडिताची मतिदेखील स्थिर झाली व ताे नाथांचा सहचर झाला आणि नाथांचे प्रतिष्ठान आनंदवन झाले.
 
तुला एक गम्मत सांगताेएक साहित्यिक म्हणताे की नाथांनी विपुल वाङ्मय लिहिले असले तरी आजपर्यंत मी जे वाङ्मय लिहिले आहे ते नाथांच्यापेक्षा जास्त आहे म्हणून मी असा दावा करू शकताे की माझी उंची नाथांच्यापेक्षा जास्त आहे.अग त्या साहित्यिक महाशयांनी नाथांच्यापेक्षा जास्त वाङ्मय लिहिले तरी त्यांची उंची नाथांच्यापेक्षा जास्त आहे, असे कसे म्हणता येईल? या बाबतीत एक मजेशीर गाेष्ट अशी आहे की - एके दिवशी नेपाेलियन आपल्या वाचनालयात एक पुस्तक हुडकत हाेता. ते पुस्तक एका शेल्फवर उंच जागी ठेवलेले हाेते. नेपाेलियनने प्रयत्न करून पाहिला, पण त्याचा हात तेथपर्यंत पाेचेना, त्याच्या सैन्यात सर्वांत उंच म्हणून प्रसिद्ध असलेला मार्शल माॅन्सी जवळच उभा हाेता. ताे पुढे सरसावला व किंचित अभिमानाने नेपाेलियनास म्हणाला- ‘‘महाराज, आपणापेक्षा मी उंच आहे. आपणाला पाहिजे असलेले पुस्तक मी काढून देताे.’’ नेपाेलियनने लगेच उत्तर दिले- ‘‘तुम्ही माझ्यापेक्षा उंच नाही. लांबीने अधिक आहा’’ अग ते साहित्यिक महाशय नाथांच्यापेक्षा उंच नाहीत, लांबीने अधिक आहेत.
 
*** नाथांनी उतारवयात लिहिलेला शेवटचा ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण.या सप्तकांडात्मक रामायणाची पहिली पाच कांडे आणि सहाव्या कांडाचे 44 अध्याय लिहून झाल्यावर नाथांना वाटले की आता आपला अंतकाळ जवळ आला आहे.गंगातीरी राहणारा गावबा नावाचा एक मुलगा नाथांच्या घरी पैठणास राहत असे. नाथ व त्यांची पत्नी गिरिजा यांनी त्याचे पुत्रवत पालन केले. नाथांच्या घरी ताे पंधरा वर्षे हाेता व नाथमय हाेऊन गेला हाेता. भावार्थरामायणाची पुढील रचना नाथांनी गावबावर साेपवली व आपण देह ठेवणार असे जाहीर केले. ही बातमी जिकडे तिकडे पसरली. नाथांच्या दर्शनार्थ हजाराे लाेक येऊ लागले. सर्वत्र नामघाेष सुरू झाला. पैठण नगरी वैकुंठ नगरी भासू लागली. हरिनाम कल्लाेळात शके 1521 फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी नाथ महाराज समाधिस्थ झाले.