3. बली : राक्षसराज बली हा अतिशय दानशूर हाेता.त्यामुळे देवादिकांनाही चिंता उत्पन्न झाली.भगवान श्रीविष्णू बटूचे रूप घेऊन त्याला दान म ागायला गेले. राक्षसांचे गुरू शुक्राचार्यांनी दानाच्या झारीच्या छिद्रात लपून ते टाळण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना काडी टाेचल्याने छिद्र माेकळे झाले. शुक्राचार्यांनी एक डाेळा गमावला; पण बलीने मात्र तीन पावले जमीन बटूला दान देण्याचे मान्य केले. या तीन पावलांत स्वर्ग, पृथ्वी, पाताळ तिन्ही सामावले.अतिदानत असल्यानेच बली वचनबद्ध झाला.
बाेध : प्रत्येक गाेष्ट एका विशिष्ट प्रमाणातच असायला पाहिजे, नाही तर सद्गुणदेखील अत्यंत घातक ठरतात.