गीतेच्या गाभाऱ्यात

    17-Dec-2022
Total Views |
 
 
पत्र एकतिसावे
 
 
bhagvatgita
 
नाथ त्याला म्हणाले- ‘हे पाहा. तू इत्नयात मरत नाहीस तुला अजून बरेच आयुष्य आहे. तुम्ही कसे चांगले वागता, आणि आम्ही का चांगले वागत नाही- असा प्रश्न तू मला सात दिवसांपूर्वी विचारला हाेतास. त्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले ना? असे तुम्ही मरणाचे स्मरण ठेवत नाही; म्हणून चांगले वागत नाही.आम्ही मरणाचे स्मरण ठेवताे म्हणून चांगले वागताे. तुला आता कळले ना?’’ नाथांचे हे उद्गार ऐकून जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. ताे मनुष्य अंथरुणावरून उठला. साऱ्यांनी नाथांना नमस्कार केला व म्हटले एकनाथ महाराज की जय -असे सार्थत्वाने म्हटले जाते. पारिजातकाचे फुललेले झाड हलवले म्हणजे सुगंधी फुलांचा सडा पडताे, त्याप्रमाणे नाथांच्या ताेंडून सुविचारांचा सडा लाेकांच्या कल्याणाकरता सारखा पडत हाेता. अ‍ॅरिस्टाॅटलने म्हटले आहे की लेखकाच्या विचाराची भूमिका तत्त्वज्ञानाची असावी पण आपले तत्त्वज्ञान स्पष्ट करून सांगताना बहुजन समाजाला समजेल अशा भाषेचा त्याने उपयाेग करावा, म्हणजेच ताे खरा लाेकसाहित्यकार हाेईल. अ‍ॅरिस्टाॅटलच्या चष्म्यातून पाहात नाथ अत्युत्कृष्ट लाेकसाहित्यकार हाेते.
 
नाथांचा भागवताच्या एकादश स्कंदावरील मराठी ओवीबद्ध ग्रंथ म्हणजेएकनाथी भागवत हा महान ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरीचा दुसरा अवतार नाथांनी एकनाथी भागवताची पहिली पंचाध्यायी पैठणला लहिली. पण पुढे 1492 ते 1495 पर्यंत तीन वर्षे नाथांनी हा ग्रंथ काशी मु्नकामी लिहिला. भागवतधर्माचे रहस्य नाथ मराठीत आणताहेत हे पाहून काशी मु्नकामी त्यांचा फार छळ झाला. पण जेव्हा 1495 कार्तिक शुद्ध 15 पाैर्णिमेच्या दिवशी हा ग्रंथ परिपूर्ण झाला, तेव्हा ताे अलाैकिक ग्रंथ पाहून एकनाथांना छळणारे लाेकदेखीलइतके खुश झाले की त्या विद्वमान्य महान ग्रंथाची पालखीतून साऱ्या काशीभर माेठी मिरवणूक काढण्यात आली.नाथांची आजी व आजा वारल्यानंतर नाथ पंढरपूरास गेले.पंढरपुरात तेथील लाेकांच्या आग्रहामुळे नाथानी गरुडा पारापुढे चार कीर्तने केली. नाथ दत्तसांप्रदायी हाेते, पण दत्त- विठ्ठल यांचा अभेद अनुभवाने कळल्यामुळे त्यांनी पंढरीची आषाढी कार्तिकी वारी पत्करली.
 
ज्ञानदेवांनी महाराष्ट्रात भागवतधर्माचा पाया घातला व नाथांनी त्या धर्माची ध्वजा फडकावली.शके 1505 मध्ये नाथ आळंदीस गेले. स्वप्नात त्यांना ज्ञानेश्वर भेटले हाेते आणि नाथांनी ज्ञानेश्वराला भ्नितप्रेमाने लाेटांगण घातले. त्यावेळचा नाथांचा आनंद वर्णन करण्याच्या पलीकडचा आहे. त्या सुतराम दिव्य भव्य रम्य स्वप्नदृष्टान्ताचा परिपाक म्हणजे नाथांनी केलेल्या ज्ञानेशांच्या समाधीचे व ज्ञानेश्वरीचे संशाेधन.नाथांना एक मुलगा व दाेन मुली अशी अपत्ये हाेती.पहिली कन्या गाेदावरी पैठणातच राहणाऱ्या चिंतामणीशास्त्री यांना दिली हाेती. चिंतामणीशास्त्री पंडित हाेते, व्युत्पन्न हाेते, पण तारुण्याच्या भरात ते विषयी निघाले. त्यांच्या त्या व्यसनामुळे बिचारी गाेदावरी खंगू लागली. पती व्यसनाधीन झाला की पत्नी दु:खाधीन हाेते.