एखादं तट्टू किंवा खेचर रथाला लावलं तर ते एखादवेळी रथाला धाे्नयात आणणार नाही, ते आपलं रथ ओढत राहील; पण जाे घाेडा लगाम नसताना रथ खड्ड्याकडे नेईल ताे शानदार. लगाम लावला की ताेच घाेडा रथ नीट ओढेल, खेचर रथाला खड्ड्याकडे नेणार नाही हे खरं. तरीपण कुठं त्या घाेड्यानं रथ ओढणं, आणि कुठं खेचरानं ओढणं! लगाम नसला तर खेचर आराम करील. अन् लगाम असला तरी खेचर ते खेचर, ते रथ कितीसा ओढील, काय वेगाने ओढील? जी इंद्रिये आपणाला धाे्नयात टाकतात तीच आपली जाेमदार श्नती आहेत. पण आपली स्वत:ची मालकी असेल तरच. मग शुभ फलित हाेईल. मालकी नसेल तर अशुभ फलित हाेईल.
आपणास जास्तीत जास्त धाे्नयात नेणारी, खड्ड्यात टाकणारी काेणती इंद्रिये आहेत?
जास्तीत जास्त धाे्नयात नेणारे इंद्रियं म्हणजे जननेंद्रिय-काम-से्नस. हे इंद्रिय जास्त श्नितशाली आहे, सर्वांत जास्त पाेटेंशियल, ऊर्जावान. लक्षात ठेवा जाे काेणी आपल्या कामऊर्जेवर मालकी मिळवील, त्याच्याजवळ मग इतका अद्भुत, इतका बलशाली घाेडा असताे की, ताेच घाेडा त्याला स्वर्गाला नेऊन पाेहाेचवताे. पण उलट जेव्हा आपण कामऊर्जेचेच गुलाम असता, तेव्हा ती आपणास वेश्यालयाच्या गटारात, चिखलात लाेळविते. किड्यांमध्ये टाकते. अन् जेव्हा आपली या कामऊर्जेवर मालकी असते, तेव्हा तिच कामऊर्जा ब्रह्मचर्य बनून जाते.