महान ग्रीक तत्त्ववेत्ता साॅके्रटिस आणि त्याची पत्नी यांचीही गाेष्ट प्रसिद्ध आहे.साॅक्रेटिस अत्यंत शांत, तर पत्नी कजाग. ती भांडली तरीही ताे शांतच राहत असे.तिने चिडून एकदा त्याच्या डाेक्यावर पाणी ओतले. तरीही ताे शांतच! तिला वाटले असा कसा हा माणूस! तिला ताे म्हणाला, ‘गरजल्यावर बरसणारच’, जी गाेष्ट कुटुंबाच्या बाबतीत; तीच विश्व कुटुंबाच्या बाबतीतही लागू हाेते. खूप लाेक कुरापतखाेर असतात; अशावेळी ‘माैनं सर्वार्थ साधनम्’ हेच खरे!
4. सतर्कता : नेहमी सावध राहणाऱ्याला कशाचीही भीती वाटत नाही.कुठल्याही प्रसंगाचा सामना करण्यासाठी ताे सज्ज असताे. हल्ला हाेण्याची भीती बेसावध लाेकांना असते. आळशी, नाकर्त्या व्यक्ती नेहमी ‘मलाच कशाला राेग हाेईल, माझ्याच घरी चाेर कशाला येतील’ असा विचार करतात.
बाेध : पावसाळ्यात जी व्यक्ती छत्री साेबत ठेवते, त्या व्यक्तीची कधीच फजिती हाेत नाही.म्हणतात ना, ‘झीर्शींशपींळेप ळी लशीींंशी ींहरप र्लीीश!’ म्हणजेच विचारपूर्वक वर्तन केल्यास वाईट गाेष्टी नेहमीच आपल्यापासून दूर राहतात.