गीतेच्या गाभाऱ्यात

    16-Dec-2022
Total Views |
 
 
पत्र एकतिसावे
 

bhagvatgita 
 
‘‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’’ - हे नाथांचे ब्रीद हाेते. श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांच्या आधी महारांना बाेलावून त्यांची पाेटाची खळगी भरण्याकरता त्यांना जेवू घालणारे, उन्हात वाळवंटात तडफडणाऱ्या महाराच्या मुलाला उचलून घेऊन त्याच्या आईबापाकडे पाेचते करणारे, तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवाच्या ताेंडात आपल्या कावडीतील गंगाेदक घालून तेथेच रामेश्वराची यात्रा संपवणारे, देवडीवरच्या यवनाने खूप वेळा अंगावर ‘चूळ’ टाकली तरी न रागावता नदीत जाऊन स्नान करणारे एकनाथ महाराज म्हणजे - प्रेमाचा पुतळा, अनाथांचा जिव्हाळा; समाजसेवकांचा शिराेमणी, चिंतकांचा चिंतामणी; आणि भ्नतांची माऊली, दीनांची साऊली हाेते.
आपल्या पिढीतील समाजावर नाथांनी वाणी, लेखणी व करणी यांनी जाे ठसा उमटविला त्या बाबतीत त्यांची बराेबरी करणारा मनुष्य दुसरा काेणीही नाही, असे अत्यंत आदराचे उद्गार विद्वान संतभ्नत मिशनरी अ‍ॅबट यांनी काढले आहेत.
 
नाथांच्याकडे एक इसम आला व म्हणाला - ‘नाथ, तुम्ही इतके चांगले कसे वागता? आम्ही का चांगले वागत नाही?’ नाथ म्हणाले- ‘हे पहा, मला सांगायला दु:ख हाेते की - आजपासून सात दिवसांनी तू मरणार आहेस.’ ताे मनुष्य घरी गेला. त्याला वाटत हाेते की - नाथांचा शब्द म्हणजे ब्रह्मवा्नय. आपण आता सात दिवसांनी मरणार.सात दिवसांनी मरणार म्हटल्यावर ताे फार चांगला वागू लागला.ताे पूर्वी बायकाेवर, मुलांच्यावर, शेजारापाजाऱ्यांवर फार रागावत असे पण आता ताे साऱ्यांशी फार फार ममतेने वागू लागला. त्यांची बायकाे मनात म्हणू लागली - ‘हे किती किती चांगले आहेत.’ मुलांना बाबांच्याबद्दल पराकाष्ठेचे प्रेम वाटू लागले. शेजारी पाजारी म्हणू लागले- मनुष्य असावा तर असा असावा.सातवा दिवस उजाडला. त्या इसमाला वाटले - आज आपण मरणार.
 
नाथांचा शब्द खाेटा हाेणार नाही याबद्दल त्याची बालंबाल खात्री हाेती.त्याने अंथरूण धरले. येणाऱ्या जाणाऱ्याला ताे म्हणू लागला - ‘आज मी देवाघरी जाणार. माझं काही चुकलं माकलं असेल तर क्षमा करा.’ ताे जाणार म्हटल्यावर लाेकांना फार वाईट वाटू लागले.
दुपारी नाथ त्याच्या घरी गेले. त्याची बायकाे व मुले नाथांच्या पाया पडली व म्हणाली - ‘नाथ, यांना वाचवा. अहाे, ह्या आठवड्यात हे फार चांगले वागताहेत. यांच्यावर कृपा करा आणि यांचे मरण टाळा.’ शेजारीपाजारी लाेक डाेळ्यात पाणी आणून म्हणाले- ‘नाथ, यांना वाचवा हाे. असा मनुष्य मिळणे कठीण, ताे मनुष्य माेठ्या कष्टाने उठला. नाथांच्या पाया पडला व म्हणाला-’ ‘मी आता लवकरच जाणार. मला आशीर्वाद द्या. काही चुकलं असेल तर क्षमा करा.’