देह साेडल्यानंतर याेग्याने काेठे जावयाचे या संबंधी अनादि असे दाेन मार्ग आहेत. असे मागच्या ओवीत सुचविले आहे. एक ब्रह्माकडे नेणारा मार्ग व दुसरा ब्रह्मापासून दूर नेणारा मार्ग. आपल्या हितासाठी परमेश्वरप्राप्तीचा मार्ग काेणता व प्रपंचाचा मार्ग काेणता, आपले हित कशात आहे, हे आपण ओळखले पाहिजे. नाव चांगली आहे असे दिसल्यावर काेणी अथांग पाण्यात उडी टाकील का? विष व अमृत यांतील अंतर ज्याला समजले आहे ताे अमृत साेडून देईल का? म्हणून खरे काय, खाेटे काय हे नीट जाणून घ्यावे. नाहीतर मरणाच्या वेळी धूम्रमार्गाचे संकट उभे राहते व जन्मभर केलेला अभ्यास व्यर्थ हाेताे. अर्चिरादि मार्ग एकदा चुकला आणि दैववशात् धूम्रमार्ग सापडला तर मनुष्य संसारात जखडला जाताे आणि त्याला जन्ममरणांचे ेरे भाेगावे लागतात.
ब्रह्मस्वरूपाला प्राप्त हाेणे किंवा संसारात गुरफटणे यांचा लाभ मरणकाळी दैवेयाेगे जाे मार्ग प्राप्त हाेताे त्यावर अवलंबून आहे.म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, या दाेन्ही मार्गांची अनिश्चितता जाणून नेहमी आत्मविचारच करावा.अर्जुना, अशा या अनिश्चित स्वरूपाच्या मार्गांचा ारसा विचार न करता आपण अर्चिरादि मार्गांनेच ब्रह्मरूप हाेणार असा निश्चय तू करावास. दाेरी ही दाेरी आहे हे कळल्यावरतीवरील सर्पाचा भाव नाहीसा हाेताे. देह जावाे वा राहाे, आपण केवळ ब्रह्मरूप आहाेत असे जाणावम्हणून ज्ञानी पुरुषाने धूम्रमार्ग चुकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एका मार्गाने जाणारा मनुष्य ब्रह्मस्वरूपाला मिळताे. तर दुसऱ्या मार्गाने जाणारा मनुष्य संसारात गुरफटताे.