गीतेच्या गाभाऱ्यात

    15-Dec-2022
Total Views |
 
 
पत्र एकतिसावे
 

Bhgavatgita 
 
त्या पंचायतनापैकी ज्ञानेश्वरांचे लग्नच झाले नाही.रामदास लग्नाला उभे राहिले, पण सुमुहूर्त सावधान म्हटल्यावर पळून गेले. नामदेव, तुकाराम यांनी लग्न केले, पण त्यांच्या बायकांनी परमार्थ मार्गात त्यांना साथ दिली नाही.एकनाथ मात्र खरेखुरे भाग्यवान की त्यांच्या पत्नीने त्यांना परमार्थ मार्गात खरीखुरी साथ दिली व त्यामुळे प्रपंच व परमार्थ यांचा समन्वय कसा करावा याचे चालते बाेलते उदाहरण म्हणजे एकनाथ महाराज असे लाेक बाेलू लागले.नाथांच्या पत्नीचे नांव गिरिजाबाई.त्या माऊलीचे नाव घेतल्याबराेबर माझे अंत:करण आनंदाने भरून येते. ही माऊली गृहकृत्यात दक्ष, मृदुभाषिणी, मायाळू, ममताळू, दयाळू, कृपाळू हाेती. अनाथांना आणिअभ्यागतांना ती प्रेमाने वागवी. रात्र असाे, दिवस असाे, वेळ असाे, अवेळ असाे, भुकेल्या माणसांना खाऊ घालण्यात तिने कधी आळस केला नाही.
नाथांना मातृसुख लाभले नाही; पण पत्नीसुख भरपूर लाभले.
 
नाथांच्या घरी श्राद्ध हाेते. सैपाक तयार झाला हाेता. ब्राह्मण अद्याप येणेचे हाेते. नाथ दारात उभे हाेते. बाहेरून काही महार चालले हाेते. त्यांना पराकाष्ठेची भूक लागली हाेती. सुग्रास अन्नाचा वास त्यांना आला. ते आपसात म्हणालेआपण भुकेने तडफडत असताना असे सुग्रास अन्न मिळाले, तर किती मजा येईल.! नाथांनी हे शब्द दाराआडून ऐकले. ते सैपाकघरात गेले.त्यांनी पत्नीला विचारले - ‘‘आपल्या घरापुढून महार चालले आहेत. ते भुकेने तडफडत आहेत. त्यांना आपण अगाेदर जेवायला घालूया का?’’ हल्लीच्या सुधारलेल्या काळी देखील स्त्रीने हाेय म्हणणे कठीण आहे पणनाथांची पत्नी - ती माऊली - म्हणाली - ‘‘हे काय विचारणं झालं! त्यांना अगाेदर आत बाेलवा.मी त्यांची पानं वाढते. त्यांना पाेटभर जेवू घालते.
 
पुन्हा सैपाक करते आणि मग श्राद्धाच्या ब्राह्मणांना वाढते.’’ हे पहा, पैठणला मी नाथांच्या घरी गेलाे तेव्हा हा सारा देखावा मला दिसू लागला आणि माेठ्या भ्नितभावाने मी त्या माऊलीला नमस्कार केला.माझ्या ताेंडून एकदम उत्स्फूर्त उद्गार निघाले - प्रपंच साधून । परमार्थ केला। एकनाथ झाला। भला भला ।। काही लाेक म्हणतात कीकवीचे चरित्र कसे का असेना, पण त्यांचे काव्य चांगले असले म्हणजे झाले.मला वाटते- या बाबतीत मिल्टनचे म्हणणे जास्त चांगले आहे.ताे म्हणताे - सुंदर काव्याची निर्मिती कवीला करावयाची असेल, तर आपले सर्व चरित्रच एक सुंदर काव्य हाेईल अशी दक्षता कवीनेघेणेस पाहिजे.नाथांच्या बाबतीत मिल्टनचे हे उद्गार नितांत सार्थ आहेत.नाथांचे चरित्रच एक सुंदर काव्य आहे आणि त्या चरित्राचा लालित्यपूर्ण आविष्कार म्हणजेच त्यांचे काव्य.