चाणक्यनीती

    14-Dec-2022
Total Views |
 
 

Chanakya 
 
वाच्यार्थ:उद्याेगी व्यक्ती कधी धनहीन राहत नाही.(परमेश्वराच्या नावाचा) जप करणाऱ्या व्यक्तीजवळ पाप येत नाही. माैनबाळगल्यास भांडण हाेत नाही आणि जाे नेहमी सतर्क असताे, त्याला कशाची भीती वाटत नाही.
 
भावार्थ : वाईट परिस्थिती टाळण्यासाठी काय करावे, हे येथे सांगितले आहे.
 
1. परिश्रम : सतत कार्यमग्न राहणाऱ्या व्यक्तीला तिच्या कष्टाचा माेबदला मिळताेच.एवढेच नव्हे, तर ती व्यक्ती धनिकही बनते; धनाचा ओघ सुरूच राहताे. त्यामुळे त्या व्यक्तीला आयुष्यात काहीही कमी पडत नाही. म्हणूनच म्हणतात, ‘उद्याेगाचे घरी रिद्धी-सिद्धी पाणी भरी’, ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ याचाही अर्थ ताेच. काम करणाऱ्या बाेटात-हातात लक्ष्मी वास करते.याच अर्थाची एक छान चाराेळी आहे, ‘परमेश्वर भविष्यरेषा शरीरावर कुठेही देऊ शकला असता; पण मग ‘तुझे भविष्य तुझ्या हातात आहे’ असे म्हणू शकला नसता!