चाणक्यनीती

    13-Dec-2022
Total Views |
 
 
 

Chanakya 
 
3. जनपद : जनपद म्हणजे एखादे राष्ट्र किंवा देश.देशाची कीर्ती वाढविताना किंवा देशाचे हित जपताना जर एखादे गाव देशविराेधी कारवाया करणारे असेल, तर संपूर्ण गावाचा (त्यातील जनसमूहासह) त्याग करावा, त्याला वगळावे.
 
4. आत्मन् : स्वत:च्या कल्याणाच्या, स्वत:च्या आत्माेन्नतीच्या आड जर जगाची रीत येत असेल; तर संपूर्ण जगाचा, पृथ्वीचाच त्याग करावा.
 
बाेध : त्यागण्याची वेळ आलीच तर नेहमीच अनेकांच्या कल्याणासाठी ‘एकाला’ साेडावे; पण आत्महितासाठी मात्र सर्वकाही साेडून द्यावे. कारण आत्माेन्नती हेच मनुष्य जन्मातील हेतू / प्रयाेजन आहे.