गीतेच्या गाभाऱ्यात

    13-Dec-2022
Total Views |
 
 
पत्र तिसावे
 

Bhagvatgita 
 
कृष्ण गेल्यावर वसुदेवाने अन्नपाणी वर्ज्य करून प्राण साेडला. रु्निमणी, गांधारी, शैव्या, हेमावती व जांबवती या कृष्णाच्या पाच स्त्रिया सती गेल्या व सत्यभामा, लक्ष्मणा आणि मित्रविंदा या तीन स्त्रिया तप करण्याकरिता अरण्यात गेल्या.श्रीकृष्णाचा जन्म जितका दिव्य तितकेच त्याचे जीवन देखील दिव्य आणि त्याचा मृत्यूदेखील तितकाच दिव्य.सज्जनांचे संरक्षण आणि दुष्टांचे निर्दालन हे त्या महात्म्याचे ब्रीद हाेते.कृष्ण म्हणजे नीतिमत्तेचा मूर्तिमंत अवतार.काँटने म्हटले आहे कीआम्ही तत्त्वज्ञानी लाेक नीतिमत्तेला पुरुषी वेष चढवताे पण असा पूर्णपुरुष जगात झाला नाही.काँटच्या म्हणण्याला पुस्ती जाेडून व त्यात दुरुस्ती करून असे म्हणावे लागेल की - असा पूर्ण पुरुष म्हणजे श्रीकृष्ण.गीतेच्या गाभाऱ्यात तू कृष्णाचे तत्त्वज्ञान समजून घे.
 
त्या जीवनाशिवाय गीतेचे तत्त्वज्ञान म्हणजे सुराविना संगीत, शब्दाविना साहित्य व गळ्याविना गाणे आहे. तू फार चांगली गातेस. तुझा गळा चांगला आहे. मला वाटते की तुझ्या जीवनाच्या गळ्यातून गीतेचे गाेड गाणे येऊ द्या व मंत्रमुग्ध हाेऊन म्हणू द्यातुझाच राम पत्र एकतिसावे प्रिय जानकी, तुझे पत्र पावले. तू आपल्या पत्रात लिहितेस-- ‘‘तुम्ही एका पत्रात नामदेवांच्या बद्दल माहिती सांगितली.
ज्ञानेश्वरांची माहिती सांगून तर तुम्ही माझ्या डाेळ्यात अश्रू आणले. तुमच्या पत्रामुळे गीता कशी जगावी, ते मला समजते आहे.नगरला न्यायाधीश असताना तुम्ही पैठणला गेला असताना नाथांनी तुम्हाला दिव्य अनुभव दिला हाेता. आता कृपा करून गीतेच्या गाभाऱ्यात मला नाथांच्याबद्दल माहिती सांगा.
 
*** तुझा विचार फार चांगला आहे. वाणी, लेखणी आणि करणी अशा तिन्ही साधनांनी मानवजातीची सेवा करणारे, निर्गुण निराकार परमेश्वराला सगुण साकार रूपात -मानवरूपात -पाहणारे, अवलाेकिता जन दिसे जनार्दन। जन नाेहे अवघा जनार्दन असे म्हणून जनसेवा म्हणजेच देवभ्नती असा उपदेश करणारे एकनाथ जे दिव्य गाणे गातात ते मानवता -धर्माचे सुरम्य सुरेल संगीत हाेय.
 
*** ज्याला दक्षिणेतील काशी म्हणतात त्या पैठणात अथवा प्रतिष्ठानात एकनाथ महाराजांचा जन्म झाला. त्यांचे पणजे प्रसिद्ध संत भानुदास - अशा या पुण्यशील, पावनशील, सत्त्वशील, भ्नितशील कुलात नाथांचा जन्म शके 1450 साली झाला. नाथ जन्मल्यावर थाेड्याच दिवसांत त्यांचे वडील सूर्यनारायण व आई इहलाेक साेडून गेले.आईबाप वारल्यामुळे नाथांचे पालनपाेषण त्यांचे आजे चक्रपाणी व आजी यांनी केले.