ओशाे - गीता-दर्शन

    12-Dec-2022
Total Views |
 

Osho 
हाही मालक नाहीच.म्हणून क्षमा मागितल्यावर असे समजण्याची गरज नाही की, आता पुन्हा उद्या ताे थाेबाडीत मारणार नाही. ताे उद्या पुन्हा थाेबाडीत मारू शकताे.ही आहे आपल्या इंद्रियांची स्थिती तुकडे.डिस इंटिग्रेटेड. अन् एक एक इंद्रिय अशा प्रकारची कामं करवून घेत राहतं की, काही बाेलायची साेय नाही. कधी कधी तुमच्याकडून इंद्रियं इतकी भारी मूल्यं पणाला लावून घेतात की, इत्नया छाेट्याशा गाेष्टीसाठी इतकं मूल्य आपण एरवी कधीच पणाला लावलं नसतं. कधी कधी एक दाेन पैशांसाठी माणसं एक-दुसऱ्याचा जीव घेतात. वस्तूची किंमत काहीवेळा तर दाेन पैसेही नसते. कित्येकदा मध्ये वस्तू नसतेच, निव्वळ शब्द असताे. अन् त्याच्यामुळे जीव जाताे, नंतर काेणी नीट विचार केला तरच हे लक्षात येईल..
 
मी असं ऐकलंय. एकदा एका शाळेत इतिहासाचे शिक्षक मुलांना विचारीत हाेते - ‘तुम्हाला माहीत असलेल्या माेठ्यात माेठ्या लढाईची माहिती सांगा’ एक विद्यार्थी उभा हाेऊन म्हणताे, ‘मी सांगताे, पण एका अटीवर. मी असं बाेललाे हे माझ्या घरी कळता कामा नये.’ ‘काेणती लढाई?’ शिक्षकांनी विचारले.विद्यार्थी म्हणाला, ‘माेठ्यातली माेठी लढाई मला एकच माहीत आहे. अन् ती म्हणजे माझी आई आणि माझे वडील यांच्यामधली.’ शिक्षकांनी म्हटले, ‘गाढवा! ही काय लढाई म्हणायची?’ त्याने घरी येऊन वडिलांना म्हटले, ‘‘मी तुमच्या सगळ्यात माेठ्या लढाईची चर्चा केली, तर इतिहासाचे शिक्षक म्हणतात, गाढवा! ही काय लढाई म्हणायची?’’ वडिलांनी लगेच चिठ्ठी लिहून शिक्षकांना विचारले, ‘यापेक्षा माेठी लढाई आणखी आहे का जगात?’