धन्य धन्य शुध्द जाती । संदेह कैंचा तेथें चित्ती ।।1।।

    01-Dec-2022
Total Views |
 
 

saint 
आपल्या भारतीय समाजात प्राचीन काळापासून व्यावहारिक दृष्टीकाेनातून तसेच आप-पर भावनेतून अनेक जाती निर्माण झाल्या. जानाची निर्मिती म्हणजे मानवांची विभागणी हाेय. मानवांना एकमेकापासून वेगळे करण्याचे माध्यम म्हणजे जात. स्वार्थ, अहंकार, द्वेष, ईर्षा आदिपाेटी मानवाच्या मनातून जी जात नाही ती जात हाेय. असाे, संतांना अशा जातींशी कांही देणे-घेणे नाही.ढाेबळमानाने स्वार्थी आणि निस्वार्थी असे दाेन प्रकार संतांनी विचारात घेतले. स्वार्थींना निस्वार्थी बनविण्याचा व निस्वार्थींना निस्वार्थात टिकवून ठेवण्याचा प्रयत्न संतांनी केला. जी व्यक्ति निस्वार्थ आहे, त्याची भावना, श्रध्दा ही सुध्दा निस्वार्थी असते. अशांच्या भावामध्ये, श्रध्देमध्ये व्यवहाराला स्थान नसते. अशांच्या चित्तात कसल्याही प्रकारचा संदेह नसताे.
 
चित्ताची स्थिरता एकात्मता पावते. यांच्याकडे आप-पर, द्वैत, अहंकार, द्वेष, मत्सर, काम, क्राेध आदिंना स्थान नसते. त्यामुळे यांची जातही खराेखरच शुध्द असून ती धन्य आहे. अशा धन्य जातींच्या लाेकांच्या स्थिरत्वाबद्दल, एकात्मतेबद्दल कसलाही संदेह बाळगू नये. हे सांगतांना तुकाराम महाराज म्हणतात, धन्य धन्य शुध्द जाती । संदेह कैचा तेथें चित्ती ।। जय जय राम कृष्ण हरी - डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448