गीतेच्या गाभाऱ्यात

    01-Dec-2022
Total Views |
 
 
पत्र एकाेणतीसावे
 

bhagvatgita 
 
तू असेही लक्षात घे की ज्यावेळी राजसूय यज्ञामध्ये कृष्णाची अग्रपूजा करणेचे ठरले त्यावेळी शिशुपालाने कृष्णाची खूप निंदा केली. जेव्हा मनुष्य आपल्या शत्रूची निंदा करताे तेव्हा ताे त्याच्या साऱ्या दुर्गुणांवर बाेट ठेवताे. शिशुपालाने कृष्णाची मनसाे्नत निंदा केली पण त्याने देखील कृष्णाने गाेपींशी व्यभिचार केला असे म्हटलेले नाही.मांगल्याचे मांगल्य म्हणजे मातृप्रेम. त्या मातृप्रेमात ज्याला अमंगल दिसते ताे स्वत:च अमंगल असताे.कृष्णाच्या जीवनात भ्नितप्रेमाला पराकाष्ठेचे महत्त्व आहे.गीतेत कृष्णाने ज्ञान सांगितले, कर्म सांगितले व भ्नितदेखील सांगितली. गीतेचे तात्पर्य काय ह्याबद्दल विद्वानामध्ये फार फार वाद आहे. त्या सर्व विद्वानांना मान देऊन गाेपाळकृष्णाला नमस्कार करून गीता माऊलीचा आशीर्वाद घेऊन न्यायाधीशाच्या भूमिकेतून बाेलायचे म्हणजे करताना भ्नतीला प्रधान मानले आहे. ज्ञानाला महत्त्व देणारे व कर्माच्या विरुद्ध बाेलणारे आद्य शंकराचार्य स्वत:बद्दल म्हणतात.
 
यद्यत्कर्म कराेमि तत्तदखिलं शंभाे तवाराधंनम्। देवा, मायबापा, शंकरा, मी जें जें कर्म करताे ती सारी तुझी पूजा आहे.आपले कर्म म्हणजे देवाची पूजा आहे असें समजून वागणे म्हणजे भ्नती आहे असा गीतेचा सिद्धांत आहे. कर्माच्या विरुद्ध बाेलणारे व गीतेचे तात्पर्य ज्ञान आहे असे म्हणणारे आद्य शंकराचार्य कर्म शब्द वापरतात व आपले सारे कर्म म्हणजे ईश्वराची पूजा आहे म्हणून भ्नतीची भाषा बाेलतात.पूज्य शंकराचार्य असेही म्हणतात की- माेक्षकारणसामगऱ्यां भ्नितरेव गरीयसी। माेक्षाच्या साधनामध्ये भ्नती हीच श्रेष्ठ आहे.गीतेचे तात्पर्य ज्ञान नसून कर्म आहे असे म्हणणारे व आद्य श्री शंकराचार्याचा सिद्धांत खाेडून काढणारे लाेकमान्य टिळक आपल्या म्हणण्याचा उपसंहार करताना म्हणतात कीज्ञानमूलक भ्नितप्रधान कर्मयाेग हेच गीतेचे तात्पर्य आहे.
 
याचा साधा अर्थ असा आहे कीगीतेमध्ये ज्ञान व भ्नती यांचा समन्वय आहे व त्या समन्वयामध्ये भ्नती प्रधान आहे.परमार्थमार्गात आल्यावर मनुष्याला असे नाही वाटत की- मला बंगला मिळावा. माेटार मिळावी, नाना तऱ्हेचे ऐहिक ऐश्वर्य मिळावे, त्याला वाटते की मला देव भेटावा, मला देवाचे दर्शन व्हावे. निदान स्वप्नात तरी देव यावा व आपण त्याच्याशी बाेलावे.अग, स्वप्नात जेव्हा देव येताे व ताे आपल्याशी बाेलताे, त्यावेळी हाेणारा आनंद मेयर किंवा मिनिस्टर हाेण्यापेक्षा, न्यायाधीश किंवा लक्षाधीश हाेण्यापेक्षा फार फार माेठा आहे.
 
नामदेवांच्या भाषेत बाेलायचे म्हणजे सेवा ताेचि चवी जाणे। येरा सांगता लाजिरवाणे। अकराव्या अध्यायात कृष्णाने अर्जुनावर खुश हाेऊन त्याला विश्वरूप दाखवले व मग बजावून सांगितले कीवाटेल तितका वेदांचा अभ्यास करा, वाटेल तितकी तपश्चर्या करा, वाटेल तितके दान द्या, वाटेल तितके यज्ञयाग करा, हे रूप बघायला मिळणार नाही; जर अनन्य भ्नती असेल तरच असे रूप बघायला मिळेल.गीतेच्या शेवटी साऱ्या गुह्यातले गुह्य सांगतांना कृष्णाने भ्नितवरच भर नि जाेर दिला आहे.लहानपणी गाेकुळ वृंदावनात असताना साऱ्या लाेकांनी कृष्णावर भ्नती प्रेमाचा इतका वर्षाव केला की माेठेपणी खूप माेठे कार्यकरणाऱ्या कृष्णाच्या जीवनाचा रंग हा भ्नितप्रेमाचा रंगच राहिला.वारकरी लाेक काल्याचे कीर्तन करताना कृष्णाचे बालपणाचे जीवनच वर्णन करतात.