ओशाे - गीता-दर्शन

    01-Dec-2022
Total Views |
 
 

Osho 
द्वारपालाने डाेकावून पाहिले. आणि सांगितले, ‘इत्नया जाेरजाेरानं दरवाजा ठाेठावयाचा नाही हं!’ त्या माणसाने म्हटले, ‘मला आत येऊ द्या बघू.’ त्याने त्याला आत नेले. द्वारपालाने त्याला विचारले. ‘आत यायची एवढी घाई करताय, पण काेणत्या कामाच्या जाेरावर ? काही शुभ काम केलंय का?’ द्वारपालाने ऑफिसात जाऊन म्हटले, ‘या महाशयांच्या नावाचा जरा सुगावा लावा बघू. कारण अशा प्रकारचा माणूस इथं येणार असल्याची आपल्याला काही सूचना नाही. यांच्या हिशेबी काही जमा आहे का बघा!’ लांबलचक हिशेब हाेता तिथं. माेठमाेठ्या जाडजूड वह्या हाेत्या. उलटापालट करून ऑफिसातला ्नलार्क घामाघूम झाला. ताे थकून म्हणाला, ‘अशी काही गाेष्ट दिसत नाही. पण काही ठिकाणी अशी नाेंद आहे की अमुक-अमुक चांगला संकल्प करायची याेजना केली यांनी; पण नंतर अशी पण नाेंद आहे की सदर याेजना स्थगित, पाेस्टपाेन झाली.
 
कित्येकदा एन्ट्री मिळाली असती यांना स्वर्गात, पण याचं खातं ‘पाेस्टपाेन’ मध्ये येतंय. असं करू, तसं करू याेजनेत राहिलं आणि याेजना स्थगित हाेत राहिल्या.तरीपण द्वारपाल म्हणाला, ‘बिचारा धापा टाकत आलाय. आणखी थाेडं नीट बघा. कुठंतरी थाेडंतरी नाेंदलंय का, की याला इथं आत येता येईल. आणखी बराच वेळ शाेधाशाेध केली तेव्हा कुठे पत्ता लागला की, सदर महाशयांनी केव्हातरी एक पैसा दान केला हाेता, कुठल्याशा भिकाऱ्याला. तळ-टीपेत असंही लिहिलं हाेतं की भिकाऱ्याला द्यायचा म्हणून हा पैसा दिलेला नव्हता. बाकीचे मित्र काय म्हणतील या भीतीने दिला हाेता.