हें समस्त श्रीवासुदेवाे। ऐसा प्रतीतिरसाचा बाेतला भावाे। म्हणाेनि भक्तांमाजीं रावाे। आणि ज्ञानिया ताेचि।। 7.136

    01-Dec-2022
Total Views |
 

Dyaneshwari 
 
ज्ञानी आणि भक्त यांचे वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात की, या सर्व विश्वात एक श्रीवासुदेवच भरलेला आहे, अशी अनुभूती ज्ञानी भक्तांना येते. असा हा पुरुष सर्व ज्ञानी पुरुषांत व भक्तांत श्रेष्ठ . या पुरुषाला अनेक जन्म झाल्यानंतर माझा साक्षात्कार हाेताे, सर्व जग नामरूपासह मीच आहे असे ताे जाणताे. पंचविषयांचे दाट अरण्य व त्यातील कामक्राेधादी संकटे यांना चुकवून ताे सद्वासनेच्या ओसाड जमिनीवर स्थिर हाेताे आणि अर्जुना, साधूंच्या संगतीत शास्त्रविरुद्ध आडवाट साेडून ताे सत्कर्मास लागताे.ताे कधी फलाची इच्छा धरीत नाही, की त्याचा हिशेबही करीत नाही. सर्व संग साेडून ताे एकटाच धावताे व त्याच्या कर्मक्षयाची प्रकाशरूपी पहाट हाेते.त्याच्यावर गुरुकृपा झाल्यामुळे ज्ञानाची तिरीप दृष्टीसमाेर येऊन साम्यत्वाचे भांडार खुले हाेते. ताे जेथे जेथे दृष्टी देईल तेथे तेथे त्याला मीच एक दिसताे. काेठेही दृष्टी न देता ताे निवांत राहिला तरीही मीच त्याला दिसताे.
 
अर्जुना, पाण्यात बुडालेल्या घड्याला आतबाहेर जसे पाणीच असते, तसे त्याला मीवाचून दुसरे काहीच दिसत नाही. ताे ज्ञानी भक्त माझ्या आंत असताे व मी त्याच्या आतबाहेर असताे. अर्जुना, खरे म्हणजे ही स्थिती बाेलून दाखविता येणार नाही. सारांश असा की, हा ज्ञानी पुरुष ज्ञानाचे काेठारच असताे. म्हणजे त्याला सर्वत्र आत्माच दिसताे. या ज्ञानाने ताे सर्व व्यवहार करीत असला, तरी सर्व विश्वच आपण हाेऊन जाताे.ताे सर्वत्र वासुदेवतत्त्वाचा अनुभव घेताे. असा हा पुरुष भेटणे अर्जुना, दुर्लभ आहे. विषयसुखाच्या आशेने याची दृष्टी मंद हाेते व भाेगांसाठीच माझे भजन जे करतात असे लाेक पुष्कळ दिसतील; पण निरिच्छ बुद्धीने काेणत्याही कर्माची आशा न ठेवता माझ्याकडे पाहणारे व माझ्यातच रमणारे मात्र ार दुर्मिळ आहेत.